वृत्तसंस्था
श्रीनगर : आजपासून श्रीनगरमध्ये G 20 ची बैठक सुरु झाली आहे. या बैठकीत G 20 देशांचे जवळपास 60 प्रतिनिधी आणि 160 पाहुणे सहभागी झाले आहेत. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी या बैठकीचे उद्घाटन केले. दोन दिवस पर्यटन कार्य समूहाची बैठक चालणार आहे. यानिमित्ताने संपूर्ण श्रीनगर सजविण्यात आले आहे. पण त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचे म्हणजे जम्मू-काश्मीर मधल्या दहशतवाद्यांना जर बसवण्यासाठी येथे भारताचे एडिट कमांडोज मार्कोस तैनात करण्यात आले आहेत.Kashmir G 20: What dare terrorists? In a moment there will be cravings; India’s elite commandos Marcos deployed there!!
दल सरोवरापासून अन्य स्थळांचे रुप पालटले आहे. जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवल्यानंतर पहिली मोठी आंतरराष्ट्रीय बैठक श्रीनगरमध्ये होत आहे. श्रीनगरमधील चौक सुंदर-सुंदर पेटिंग्सनी सजवण्यात आले आहेत. तीन दिवस चालणाऱ्या या बैठकीत पर्यटनाच्या विविध मुद्यांवर चर्चा होईल. वेगवेगळ्या देशांचे प्रतिनिधी पर्यटनाशी संबंधित आपल्या कल्पना मांडतील. जम्मू – काश्मीर हा मनोरंजन क्षेत्रातल्या सिनेमा क्षेत्रासाठी स्वर्ग असून येथे पुन्हा एकदा जागतिक सिनेमा क्षेत्राने यावे, असा आग्रह जितेंद्र सिंह यांनी धरला.
बैठकीसाठी थ्री टियर सुरक्षा
काश्मीर हे सुरुवातीपासून पर्यटनाच मुख्य केंद्र आहे. त्या दृष्टीने ही बैठक महत्वाची आहे. G-20 च्या या बैठकीवर दहशतवादी हल्ल्याच सावट आहे. दहशतवादी आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची प्रतिमा खराब करण्यासाठी G-20 च्या बैठकीला लक्ष्य करु शकतात. त्यामुळे या बैठकीसाठी थ्री टियर सुरक्षा व्यवस्था आहे.
स्पेशल फोर्सेसचे कमांडो
श्रीनगरमध्ये दल सरोवरापासून सर्वत्र कडेकोट सुरक्षा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. बैठकीला दहशतवाद्यांपासून असलेला धोका लक्षात घेऊन ही तैनाती करण्यात आलीय. श्रीनगरमध्ये स्पेशल फोर्सेसचे मार्कोस कमांडो तैनात करण्यात आले आहेत.
कोण आहेत मार्कोस कमांडो?
दल सरोवरात मार्कोस कमांडो तैनात करण्यात आले आहेत. मार्कोस हे भारतीय नौदलाचे स्पेशल मरीन कमांडो आहेत. अत्यंत वाईटातील वाईट परिस्थिती हाताळण्यात हे कमांडो निष्णांत असतात. अगदी क्षणार्धात शत्रुच्या योजना धुळीस मिळवण्याची त्यांची क्षमता आहे.
भारताच पाकिस्तानला सडेतोड उत्तर
G-20 चे सदस्य देश चीन आणि टर्की या बैठकीत सहभागी होणार नाहीत. चीनने बैठकीच्या जागेला वादग्रस्त क्षेत्र म्हटले, तर पाकिस्तानने श्रीनगरमध्ये होणाऱ्या बैठकीला विरोध केला. भारत सरकारने पलटवार करताना जोरदार प्रत्युत्तर दिलय. G 20 बैठक भारतीय प्रदेशात कुठेही आयोजित करण्यासाठी आम्ही स्वतंत्र आहोत, असे कडक प्रत्युत्तर देत भारत आणि श्रीनगर मध्ये ही बैठक आयोजित केली आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App