विशेष प्रतिनिधी
मुंबई : जीवनात एखादी वस्तू किंबहुना एखादी महागडी वस्तू आपल्याकडे असावी असं अनेकांचं स्वप्न असतं. वस्तूचं स्वरुप बदलतं, पण हे स्वप्न मात्र कायम असतं. असंच स्वप्न पाहिलं होतं, अभिनेता कार्तिक आर्यन यानं. अर्थात त्याचं हे स्वप्नही साकार झालं. अलिकडेच कार्तिकनं कोट्यवधी रुपयांची लुम्बोर्गिनी कार खरेदी केली . अन् या कारच्या तो पाया पडत होता.Kartik Aaryan touches his new car Lamborghini Urus’ ‘feet’, watch video
https://www.instagram.com/p/CNXmlCGniIO/?utm_source=ig_web_button_share_sheet
त्यानं आपल्या अनोख्या अभिनयशैलीच्या जोरावर बॉलिवूडमध्ये स्वत:चं असं एक वेगळं स्थान प्रस्थापित केलं आहे. त्यामुळं त्यानं केलेल्या प्रत्येक गोष्टीबाबत चाहत्यांना अप्रूप वाटतं .मग काय चाहत्यांनी त्याचा हा कारच्या पाया पडतानाचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल केला.
अलिकडेच ही महागडी गाडी घेऊन तो आपल्या मित्राकडे जात होता. त्यावेळी त्यानं कारमध्ये बसण्यापूर्वी तिच्या पाया पडला. ज्या प्रमाणे आपण एखाद्या मोठ्या माणसाचे आशिर्वाद घेतो अगदी त्याच भावनेनं तो आपल्या कारचे आशिर्वाद घेत होता. त्यावेळी सभोवताली असलेल्या चाहत्यांनी त्याचे व्हिडीओ काढले.
Kharid li….🚗Par main shayad mehengi cheezon ke liye bana hi nahi hoon 😂 pic.twitter.com/ic0cl1FNPa — Kartik Aaryan (@TheAaryanKartik) April 6, 2021
Kharid li….🚗Par main shayad mehengi cheezon ke liye bana hi nahi hoon 😂 pic.twitter.com/ic0cl1FNPa
— Kartik Aaryan (@TheAaryanKartik) April 6, 2021
“इतक्या महागड्या वस्तूंची मला सवय नाही” अशा आशयाची कॅप्शन देत त्यानं देखील आपल्या कारचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.
कार्तिकच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर येत्या काळात तो अभिनेत्री कियारा अडवाणी आणि तब्बू यांच्यासह ‘भूल भुलैया 2’ या चित्रपटामध्ये झळकणार आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App