वृत्तसंस्था
बंगळुरू : कर्नाटकात 10 मे रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी गुरुवारपर्यंत 3,600 हून अधिक उमेदवारांनी एकूण 5,102 उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. निवडणूक अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे. 13 एप्रिल रोजी निवडणुकीची अधिसूचना जारी झाल्याने उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाल्याचे त्यांनी सांगितले. एकूण नामांकनांपैकी 3,327 पुरूष उमेदवारांनी, 4,710 304 महिला उमेदवारांनी, तर एक नामांकन ‘इतर लिंगी’ उमेदवाराने दाखल केले होते, असे कर्नाटक मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने गुरुवारी एका निवेदनात म्हटले आहे.Karnataka Vidhan Sabha Elections 3,632 candidates have filed applications to contest the elections
निवेदनानुसार, 707 भाजप उमेदवार, 651 काँग्रेस उमेदवार, 455 JD(S) उमेदवार आणि इतर लहान पक्षांचे उमेदवार आणि अपक्षांनी अर्ज दाखल केले आहेत. अधिकार्यांच्या मते, एक उमेदवार जास्तीत जास्त चार उमेदवारी अर्ज दाखल करू शकतो. 21 एप्रिल रोजी उमेदवारी अर्जांची छाननी होणार असून उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख 24 एप्रिल असल्याचे त्यांनी सांगितले.
कर्नाटकात 10 मे रोजी मतदान
कर्नाटकात एकाच टप्प्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. 10 मे रोजी मतदान होणार असून 13 मे रोजी मतमोजणी होणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात 5.21 कोटी मतदार असून त्यात पुरुष मतदारांची संख्या 2.6 कोटी आहे, तर महिला मतदारांची संख्या 2.5 कोटी आहे.
विधानसभेच्या 224 जागांसाठी निवडणूक
कर्नाटकात विधानसभेच्या 224 जागांवर निवडणूक होणार आहे. 224 सदस्यांच्या सभागृहात काँग्रेसचे 68 आमदार आहेत. तथापि, 2018 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला 80 जागा, जेडीएसला 37 जागा आणि भाजपने 104 जागा जिंकल्या होत्या.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App