वृत्तसंस्था
बंगळुरू : कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होताच नेत्यांची वादग्रस्त वक्तव्येही येऊ लागली आहेत. अल्पसंख्याक समुदायाविरोधात द्वेषपूर्ण वक्तव्य केल्याप्रकरणी कर्नाटकचे कॅबिनेट मंत्री आणि भाजप आमदार मुनीरथना यांच्यावर एफआयआर दाखल करण्यात आला आहे. मुनीरथना यांनी अलीकडेच त्यांच्या मतदारसंघात ख्रिश्चनांच्या विरोधात कथित द्वेषयुक्त भाषण दिले होते, त्यानंतर राजराजेश्वरनगर पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध एफआयआर नोंदवला होता.Karnataka minister charged for hate speech against minorities, police action on Election Commission complaint
कॅबिनेट मंत्री आहेत मुनीरथना
आरआर नगरमधील एका निवडणूक कार्यक्रमात बोलताना आणि नंतर एका खासगी कन्नड वृत्तवाहिनीशी बोलताना मुनीरथना यांनी ‘झोपडपट्टीत धर्मांतराची कामे होत असल्याचा आरोप केला. त्यांनी लोकांना ‘त्यांना मारून परत पाठवा’ असे आवाहन केले, त्यातून काही आले तर ते सांभाळून घेऊ, असेही ते म्हणाले. मुनीरथना हे बसवराज बोम्मई यांच्या नेतृत्वाखालील कर्नाटक सरकारमध्ये फलोत्पादन आणि नियोजन, कार्यक्रम देखरेख आणि सांख्यिकी मंत्री आहेत.
या कलमान्वये गुन्हा दाखल
बृहद बेंगळुरू महानगर पालिकेच्या इलेक्शन फ्लाइंग स्क्वॉड-11 चे टीम लीड मनोज कुमार यांनी मंत्र्यांविरोधात तक्रार दाखल केली. याआधारे आरआर नगर पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध लोकप्रतिनिधी कायदा, 1950 आणि भारतीय दंड संहितेच्या कलम 153 अ अंतर्गत विविध गटांमध्ये शत्रुत्व वाढवल्याबद्दल गुन्हा दाखल केला आहे.
10 मे रोजी कर्नाटकात निवडणूक
कर्नाटक निवडणुकीबाबत बोलायचे झाले तर 10 मे रोजी मतदान होणार आहे आणि त्यानंतर 13 मे रोजी निकाल लागेल. सध्या काँग्रेसने निवडणुकीसाठी आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली असून एकूण 124 उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. दुसरीकडे जेडीएस आणि आम आदमी पार्टीनेही आपले काही उमेदवार जाहीर केले आहेत. मात्र, भाजपचे उमेदवार अद्याप जाहीर झालेले नाहीत.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App