Karnataka government ‘कर्नाटक सरकार लँड जिहाद करतंय’, भाजपचा आरोप

Karnataka government

विरोधी पक्षनेते आर. अशोक म्हणाले- हिंदूंना असुरक्षित वाटत आहे. Karnataka government

विशेष प्रतिनिधी

बंगळुरू : Karnataka government कर्नाटकातील काँग्रेस सरकार वक्फ बोर्डाच्या माध्यमातून राज्यात लँड जिहाद करत असल्याचा आरोप भाजपने सोमवारी केला. गरिबांच्या जमिनी जप्त करण्याचा प्रयत्न झाला आहे. कर्नाटक विधानसभेतील विरोधी पक्षनेते आर. अशोक यांनी या आरोपांवर मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याकडे स्पष्टीकरण मागितले आहे.

ते म्हणाले, ‘शेतकरी संकटात आहेत आणि हिंदूंना असुरक्षित वाटत आहे. जनतेला अचूक माहिती आणि स्पष्टीकरण देऊन सरकारने जबाबदारीने वागले पाहिजे. विजयपुरा जिल्ह्यातील किती मंदिरे आणि धार्मिक स्थळांना नोटिसा बजावल्या, हे राज्य सरकारने सांगावे.


Eknath Shinde Shiv Sena विधानसभा निवडणुकीसाठी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची दुसरी यादी जाहीर!


आर अशोक म्हणाले, ‘जेव्हापासून काँग्रेसचे सरकार सत्तेवर आले आहे, तेव्हापासून कर्नाटकातील सरकार एकाच समाजाला फायदा देत असल्याचे दिसून येत आहे. काँग्रेसच्या तुष्टीकरणाच्या राजकारणामुळे हिंदूंना विविध आव्हानांचा सामना करावा लागत आहे. अशोक म्हणाले, ‘राज्यात पाकिस्तान समर्थक घोषणा देण्यात आल्या आहेत. लव्ह जिहादमध्ये हिंदू महिलांना लक्ष्य केले जात आहे. आता लँड जिहाद सुरू झाला आहे. विजयपुरा जिल्ह्यातील होनवड गावात, वक्फ बोर्डाने सुमारे 12,000 एकर जमिनीवर दावा केला. जिल्ह्यात सुमारे 15 हजार एकर जमिनीवर दावा करण्यात आला आहे. महसूल विभागाने 139 शेतकऱ्यांना नोटीस बजावली आहे

गेल्या महिन्यात वक्फ मंत्री जमीर अहमद खान यांनी विजयपुरा जिल्ह्याचा दौरा करून जमिनी अधिकृत नोंदींमध्ये वक्फ मालमत्ता म्हणून दाखविण्याच्या तोंडी सूचना दिल्याचा आरोप त्यांनी केला. शेतकऱ्यांच्या संतापाचे परिणाम सरकारला भोगावे लागतील असा इशारा अशोक यांनी दिला

Karnataka government is waging land jihad BJP alleges

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात