कर्नाटकात काँग्रेसचा विजयी उन्माद; टिपू सुलतान की जय, पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा; पोलिसांत तक्रार दाखल

प्रतिनिधी

बेळगाव : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपचा पराभव करून अभूतपूर्व विजय मिळवल्यानंतर काँग्रेसला विजयाचा उन्माद चढला आहे. टिपू सुलतान की जय आणि पाकिस्तान जिंदाबाद अशा घोषणा देत काँग्रेस कार्यकर्त्यांनी हिरवा गुलाल उधळला आहे. karnataka-election-results-2023-pakistan-zindabad-slogans-in-belgaum-after-congress-victory-filed-a-complaint

कर्नाटक विधानसभेच्या २२४ मतदारसंघांसाठी १० मे रोजी निवडणूक झाली. त्या निवडणुकीचा शनिवार १३ मे रोजी निकाल लागला. यामध्ये भाजप पक्षाला धक्का बसला असून काँग्रेस पक्षाने बाजी मारली आहे.

काँग्रेसने १३६ जागांवर विजय मिळवून भाजपाचा दारुण पराभव केला. या विजयानंतर काँग्रेस समर्थकांनी अनेक ठिकाणी मोठ्या उत्साहात जल्लोष साजरा केला. या जल्लोषाचे अनेक व्हिडीओ सध्या सोशल मिडियावरून व्हायरल होत आहेत. अशाच काही व्हिडीओ मध्ये टिपू सुलतान की जय आणि पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा देण्यात आल्याचे दिसत आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

बेळगावमधील टिळकवाडी पोलीस स्थानकाच्या समोर मतमोजणी केंद्राबाहेर काही अज्ञातांनी ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा दिल्या. यावेळी त्यांच्यासोबत काँग्रेस कार्यकर्ते आणि समर्थकही उपस्थित होते.

हा व्हिडीओ वायरल झाल्यानंतर हिंदू संघटनांच्या सदस्यांनी आरोपींवर कारवाईची मागणी करत पोलिसांसमोर धरणे आंदोलन केले. यानंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तींवर गुन्हा दाखल करत आयपीसी कलम १५३ अंतर्गत एफआयआर दाखल करून पुढील तपासास सुरुवात केली आहे.

karnataka-election-results-2023-pakistan-zindabad-slogans-in-belgaum-after-congress-victory-filed-a-complaint

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात