कर्नाटकात मुख्यमंत्र्यांची खुर्ची टिकवायची मारामार; पण त्यांना आता आठवला प्रोटोकॉल!!

नाशिक : कर्नाटकात मुख्यमंत्र्यांची खुर्ची टिकवायची मारामार; पण त्यांना आता आठवला प्रोटोकॉल!!, असे कर्नाटकातले आहे एका केबल पुलाच्या उद्घाटन कार्यक्रमाच्या निमित्ताने घडले.

त्याचे झाले असे :

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या विरोधात काँग्रेसच्या बहुसंख्य आमदारांनी बंड केले. काँग्रेस मधले 138 आमदार उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार यांना मुख्यमंत्री करण्यासाठी त्यांच्या पाठीशी उभे राहिले. सिद्धरामय्या यांची खुर्ची डळमळली. पण काँग्रेस हायकमांडने सध्या तरी कर्नाटकात राजकीय शोभा व्हायला नको म्हणून सिद्धरामय्या यांच्या पाठीशी उभे राहण्याचे ठरवले. काँग्रेसचे सरचिटणीस रणदीप सुरजेवाला यांना बंगलोरला धाडले त्यांनी बंडखोर आमदारांना थोडे शांत करायचा प्रयत्न केला. बंडखोर आमदार तात्पुरते शांत झाले पण आम्ही डी के शिवकुमार यांना मुख्यमंत्री केल्याशिवाय राहणार नाही असे त्यांनी सुरजेवालांना देखील सुनावले. त्यामुळे 76 वर्षीय सिद्धरामय्या यांची खुर्ची कधीही जाऊ शकते अशी स्थिती निर्माण झाली.

अशा डळमळलेल्या मुख्यमंत्र्यांना अचानक एका कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रोटोकॉल आठवला. शिवमोगा जिल्ह्यात केबल पुलाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी तिथे पोहोचले होते. त्यांच्या मंत्रालयाने या कार्यक्रमाचे रीतसर निमंत्रण मुख्यमंत्र्यांना पाठविले होते. पण मुख्यमंत्री वेगळ्या कार्यक्रमांमध्ये वेगळे असल्याने गडकरींच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले नाहीत. त्याउलट त्यांनी गडकरींनाच कार्यक्रम पुढे ढकलायला सांगितले. कार्यक्रम पुढे ढकलला गेला नाही तो व्यवस्थित झाला.



पण त्यामुळे चिडलेल्या मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून गडकरींच्या मंत्रालयाने मुख्यमंत्र्यांचा प्रोटोकॉल तोडण्याची तक्रार केली. त्यामध्ये त्यांनी सविस्तर घटनाक्रम लिहिला. पण त्यावर गडकरींनी देखील मुख्यमंत्र्यांचा प्रोटोकॉल वगैरे काही तुटला नाही. त्यांना दोनदा रीतसर पत्रे पाठविली होती. प्रत्यक्ष कार्यक्रमाला येता येत नसेल तर, त्यांना ऑनलाईन उपस्थित राहण्याची देखील विनंती केली होती, असा खुलासा करणारी पत्रे ट्विट केली.

पण या सगळ्यात मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची राजकीय अस्वस्थताच उघड्यावर आली. सिद्धरामय्यांना काँग्रेसच्या आमदारांचे बंड रोखता आले नाही. खुर्ची वाचवायची ताकद नाही. जी काही खुर्ची वाचली, तात्पुरती आणि काँग्रेस हायकमांडच्या कृपेने वाचली हे त्यांच्या लक्षात आले. तेवढ्यातल्या तेवढ्यात आपले राजकीय अस्तित्व दाखविण्यासाठी प्रोटोकॉलचे निमित्त करून त्यांनी गडकरींच्या मंत्रालया विरोधात थेट पंतप्रधानांकडे तक्रार केली.

Karnatak chief minister wrote a letter prime minister Narendra Modi against Nitin Gadkari

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात