दिल्ली भाजपाच्या ट्विटर हँडलवरून ही माहिती देण्यात आली आहे.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : भारतीय जनता पार्टीने कपिल मिश्रा यांची पक्षाच्या दिल्ली प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती जाहीर केली आहे. आम आदमी पक्ष सोडून कपिल मिश्रा यांनी भाजपामध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांना हे पद देण्यात आले आहे. Kapil Mishra who has left AAP has been given the responsibility of Delhi Vice President by BJP
दिल्ली भाजपाच्या ट्विटर हँडलवरून ही माहिती देण्यात आली आहे. यावर कपिल मिश्रा यांनीही भाजपने दिलेल्या सर्वोच्च नेतृत्वाचे आभार व्यक्त करत ‘एवढा छोटा कार्यकर्ता उच्च पदावर पोहोचणे भाजपमध्येच शक्य आहे’, असे म्हटले आहे.
दिल्ली भाजपाकडून जारी करण्यात आलेल्या एका परिपत्रकाद्वारे सांगण्यात आले की, प्रदेशाध्यक्ष वीरेंद्र सचदेवा यांच्या निर्देशानुसार कपिल मिश्रा यांची दिल्लीच्या उपाध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. यासाठी प्रदेश सरचिटणीस हर्ष मल्होत्रा यांनी पत्र जारी करत कपिल मिश्रा यांना शुभेच्छाही दिल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App