वृत्तसंस्था
नवी दिल्ली : अभिनेत्री कंगना रनोट बुधवारी इस्रायल दूतावासात पोहोचली होती. येथे तिने इस्रायलच्या राजदूतांची भेट घेतली. या भेटीत कंगनाने इस्रायलमधील सद्य:स्थितीबद्दल चर्चा केली आणि तिच्या ‘तेजस’ चित्रपटाचे प्रमोशनही केले. आपल्या इंस्टाग्रामवर फोटो शेअर करताना तिने लिहिले की, ‘भारतातील इस्रायलचे राजदूत नाओर गिलन जी यांना भेटले.”Kangana Ranaut calls ‘Hamas’ modern Ravana; The ambassador of Israel met
आज संपूर्ण जग, विशेषत: इस्रायल आणि भारत दहशतवादाविरुद्ध युद्ध लढत आहेत. काल जेव्हा मी रावण दहनासाठी दिल्लीला पोहोचले तेव्हा मला वाटले की मी इस्रायल दूतावासात यावे आणि आजच्या आधुनिक रावण ‘हमास’सारख्या दहशतवादी संघटनांना पराभूत करणाऱ्या लोकांना भेटावे.
ज्या प्रकारे लहान मुले आणि महिलांना लक्ष्य केले जात आहे ते हृदय पिळवटून टाकणारे आहे. दहशतवादाविरुद्धच्या या युद्धात इस्रायलचा विजय होईल, अशी मला पूर्ण आशा आहे. त्याच्यासोबत मी माझा आगामी चित्रपट तेजस आणि भारताचे स्वावलंबी लढाऊ विमान तेजस याविषयी चर्चा केली.
माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना भावपूर्ण श्रद्धांजली
भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी कंगना आली होती. तिने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर लिहिले, ‘स्वदेशी तेजस लढाऊ विमानामागील दूरदर्शी आणि आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी शक्ती, स्वर्गीय श्री अटलबिहारी वाजपेयी यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली!’ कंगना तिच्या ‘तेजस’ चित्रपटाचे प्रमोशन करताना सर्वत्र दिसत आहे.
रावण दहन करणारी पहिली महिला
दिल्लीतील रामलीला मैदानावर रावण दहन करणारी ती पहिली महिला ठरली आहे. याबाबतही ती खूप चर्चेत आहे. दिल्लीतील लाल किल्ल्याच्या ऐतिहासिक मैदानावर आयोजित सर्वात मोठ्या रामलीलामध्ये कंगना रावण दहन करताना दिसली. लवकुश रामलीला कमिटीने आयोजित केलेल्या या भव्य उत्सवात अभिनेत्री व्यतिरिक्त सीएम अरविंद केजरीवाल आणि लेफ्टनंट गव्हर्नर व्हीके सक्सेनादेखील उपस्थित होते.
कंगनाचा हा चित्रपट 27 ऑक्टोबरला प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात ती वायुसेना अधिकाऱ्याची भूमिका साकारत आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App