विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : मध्य प्रदेश विधानसभेची निवडणूक हरल्याबद्दल माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांना काँग्रेसने निवृत्तीची “शिक्षा” दिली, पण राजस्थान आणि छत्तीसगड हरल्यानंतर मात्र अशोक गहलोत आणि भूपेश बघेल यांना काँग्रेसने “बक्षिसी” दिली.Kamal Nath “punishment”, but Ashok Gehlot, Bhupesh Baghel “reward”; Join National Alliance Committee of Congress!!
राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गहलोत आणि छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांना काँग्रेसने लोकसभा निवडणूक 2024 च्या नॅशनल अलायन्स कमिटीमध्ये स्थान देऊन त्यांचे राष्ट्रीय राजकारणात पुनर्वसन केले.
INDI आघाडीच्या बैठकीपूर्वी काँग्रेसने 5 सदस्यांची नॅशनल अलायन्स कमिटी बनवून त्या कमिटीला INDI आघाडीतील घटक पक्षांची जागावाटप करण्याचा अधिकार देऊन त्याच्या शिफारशी काँग्रेस वर्किंग कमिटी पुढे मांडण्याची असाइनमेंट दिली. काँग्रेसच्या नॅशनल अलायन्स कमिटी मध्ये पहिले नाव अशोक गहलोत यांचे असून त्यांच्या पाठोपाठ भूपेश बघेल, सलमान खुर्शीद, मुकुल वासनिक आणि मोहन प्रकाश यांची नावे आहेत. मुकुल वासनिकांना कमिटीचे संयोजक नेमले आहे. काँग्रेसने INDI आघाडी सिरीयसली घेतल्याची ही खुण आहे. इंडिया आघाडीतल्या घटक पक्षांच्या नेत्यांशी ही नॅशनल अलायन्स कमिटी जागावाटपाची चर्चा करेल आणि आपल्या शिफारशी काँग्रेस वर्किंग कमिटीकडे पाठवेल. त्यावर काँग्रेस वर्किंग कमिटी अंतिम निर्णय घेईल, असे सांगितले जात आहे.
पण मध्य प्रदेश मध्ये निवडणूक हरल्यानंतर माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांना काँग्रेसने घरी बसवले. त्यांना निवृत्त केले. त्यांना कुठलीही असाइनमेंट अद्याप तरी दिलेली नाही, उलट त्यांच्या ऐवजी मध्य प्रदेश मधली काँग्रेसची सूत्रे तुलनेने तरुण नेतृत्वाकडे सोपवली. त्याउलट अशोक गेहलोत आणि भूपेश बघेल यांनी अनुक्रमे राजस्थान आणि छत्तीसगडची निवडणूक हरल्यानंतर देखील त्यांचे राष्ट्रीय राजकारणात पुनर्वसन करताना त्यांना थेट नॅशनल कमिटीचे कमिटीची असाइनमेंट दिली.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App