वृत्तसंस्था
मुंबई : नाग अश्विन दिग्दर्शित प्रभासचा सायन्स फिक्शन चित्रपट ‘कल्की 2898 एडी’ने आतापर्यंत भारतात 510 कोटींचा व्यवसाय केला आहे. या चित्रपटाने शाहरुख खानच्या ‘जवान’ चित्रपटाचा विक्रम मोडला आहे. पण ‘बाहुबली 2’ आणि ‘KGF चॅप्टर 2’ च्या तुलनेत हा चित्रपट अजूनही मागे आहे.Kalki movie enters 500 crore club; Shah Rukh’s Jawaan Breaks Record; Behind Baahubali-2 and KGF-2
शाहरुखच्या ‘जवान’ चित्रपटाने 11व्या दिवशी बॉक्स ऑफिसवर 501.05 कोटी रुपयांची कमाई केली होती. ‘बाहुबली 2’ ने सात दिवसांत एकूण 539 कोटी रुपयांचे कलेक्शन केले आणि ‘KGF चॅप्टर 2’ ने सात दिवसांत एकूण 523.75 कोटी रुपयांचे कलेक्शन केले.
‘कल्की 2898 एडी’ने पहिल्या आठवड्यात 414 कोटींची कमाई केली होती. सॅकनिल्कच्या अहवालानुसार, शुक्रवारच्या 16.7 कोटी रुपयांच्या तुलनेत शनिवारी चित्रपटाची कमाई दुपटीने अधिक होती. 10व्या दिवशी चित्रपटाचे कलेक्शन 34.15 कोटी रुपये होते.
त्याचवेळी, दुसऱ्या रविवारी म्हणजेच 11व्या दिवशी चित्रपटाने 44.35 कोटींची कमाई केली. ज्यामध्ये फक्त हिंदी आवृत्तीचे कलेक्शन 22.5 कोटी रुपये आहे. आत्तापर्यंत या चित्रपटाने भारतात 510 कोटींचा व्यवसाय केला आहे.
प्रभासचा ‘कल्की 2898 एडी’ हा चित्रपट 2024 च्या बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक आहे. आगाऊ बुकिंगमध्येच चित्रपटाने चांगला व्यवसाय केला. नाग अश्विन दिग्दर्शित या चित्रपटात प्रभासशिवाय अमिताभ बच्चन, दीपिका पदुकोण, दिशा पटानी आणि कमल हसन यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. विजय देवरकोंडा, मृणाल ठाकूर, एसएस राजामौली, राम गोपाल वर्मा, दिलकर सलमान यांनी या चित्रपटात कॅमिओ केला आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App