विशेष प्रतिनिधी
अकोला : रायपूर येथे रविवारी झालेल्या धर्मसंसदेत अकोल्यातील कालीचरण महाराज यांनी भाषणात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. याप्रकरणी बुधवारी जिल्हा व सत्र न्यायालयाने कालीचरण महाराजांचा अंतरिम अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे. त्यांच्या जामीन अर्जावर आता १ जानेवारीला सुनावणी होणार आहे.Kalicharan Maharaj’s pre-arrest bail rejected by court
रायपूर (छत्तीसगड) येथे धर्म संसदेत कालीचरण महाराज यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केले होते. काँग्रेसचे नेते प्रशांत गावंडे यांच्या तक्रारीनुसार अकोल्यात कालीचरण महाराज यांच्यावर गुन्हा दाखल केला होता.
यानंतर कालीचरण महाराज याने न्यायालयात धाव घेऊन अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी अर्ज केला. बुधवारी न्यायालयात त्यांच्या जामीन अर्जावर सुनावणी झाली.न्यायाधीश शर्मा यांच्यासमोर दोन्ही पक्षांच्या वकिलांनी युक्तिवाद केला.
दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाने कालीचरण महाराज यांचा अटकपूर्व जामीन फेटाळून लावला. सोमवारी अकोल्यात काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या तक्रारीनुसार पोलिसांनी कालीचरण महाराजांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App