गिरीश चंद्र मुर्मू यांनी 8 ऑगस्ट 2020 रोजी भारताचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक म्हणून पदभार स्वीकारला होता.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : K Sanjay Murthy वरिष्ठ IAS अधिकारी के संजय मूर्ती हे CAG चे पुढील नियंत्रक आणि महालेखापरीक्षक असतील. केंद्र सरकारने सोमवारी ही माहिती दिली. संजय मूर्ती हे हिमाचल प्रदेश केडरचे १९८९ च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. ते पदभार स्वीकारल्यानंतर वर्तमान कॅग गिरीशचंद्र मुर्मू यांची जागा घेतील.K Sanjay Murthy
संजय मूर्ती सध्या शिक्षण मंत्रालयाच्या उच्च शिक्षण विभागात सचिव आहेत. अर्थ मंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभागाने जारी केलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे की, ‘भारतीय राज्यघटनेच्या कलम 148 च्या कलम (1) द्वारे त्यांना प्रदान केलेल्या अधिकाराच्या आधारे, राष्ट्रपतींनी के संजय मूर्ती यांची नियंत्रक म्हणून नियुक्ती केली आहे.
यापूर्वी, गिरीश चंद्र मुर्मू यांनी 8 ऑगस्ट 2020 रोजी भारताचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक म्हणून पदभार स्वीकारला होता. 20 नोव्हेंबरला त्यांचा कार्यकाळ पूर्ण होणार आहे
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App