वृत्तसंस्था
नागपूर : कोरोना काळात नागपुरातील सुमारे 150 कुत्र्यांना दररोज चिकन बिर्याणीची मेजवानी दिली जात आहे ज्योतिष रंजीत नाथ हा उपक्रम राबवित आहेत. कोरोना काळात राबविलेल्या भूतदयेच्या उपक्रमाचे कौतुक होत आहे. Jyotish Ranjit Nath Feeds Chicken Biryani to Street Dogs
रंजीत दादा या टोपण नावाने लोक त्यांना ओळखतात. सध्या कोरोनाच्या काळात अनेकांना एकवेळचं जेवण मिळणंही अवघड झालं आहे. अशात नागपुरच्या रस्त्यावरील भटकी कुत्री चिकन बिर्याणीवर ताव मार्ट आहेत.
कोरोनाचा प्रसार वाढल्यापासून 58 वर्षीय रंजीत दररोज 35 किलो बिर्याणी बनवतात. त्यांचे सहकारी राहुल मोटवानी यांनी सांगितलं, की अनेक वर्षांपासून ते हे काम करत आहेत. मात्र, कोरोना महामारी सुरू झाल्यापासून त्यांनी ते वाढवल आहे. रंजीत यांना भटके श्वान आवडतात आणि त्यांना ते आपली मुलं असल्यासारखं मानतात.
आता या उपक्रमात रंजीत यांना लोकांकडूनही आर्थिक मदत मिळत आहे. मोटवानी यांनी सांगितलं, की एका फूड ब्लॉगरनं रंजीत यांचा व्हिडिओ शूट करुन पोस्ट केला होता. यानंतर रंजीत यांना देणगी मिळू लागली.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App