न्यायाधीशांचे जीवन फार ऐषोरामी, त्यांना भरपूर सुट्ट्या हा समाजातील मोठा गैरसमज – सरन्यायाधीश


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली – न्यायाधीशांचे जीवन फार ऐषोरामात असते, हा समाजातील गैरसमज दूर करणे आहे. आम्ही मोठ्या बंगल्यांमध्ये राहतो, १० ते ४ या वेळेतच काम करतो, भरपूर सुट्ट्या घेतो, असा समाजात गैरसमज आहे. एकाच आठवड्यात शंभर प्रकरणांची तयारी करणे, युक्तीवाद ऐकणे, इतर प्रशासकीय कर्तव्य पार पाडणे, हे सोपे काम नाही असे मत सरन्यायाधीश रमणा यांनी व्यक्त कले.Judges have very much work in courts says supreme court Judge

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश रोहिन्टन उर्फ आर. एफ. नरीमन सेवानिवृत्त झाले. न्या. आर. एफ. नरीमन हे प्रख्यात विधीज्ञ फली नरीमन यांचे पुत्र आहेत.न्या. नरीमन त्यांच्या निवृत्तीनिमित्त सर्वोच्च न्यायालयाच्या बार असोसिएशनने त्यांचा निरोप समारंभ आयोजित केला होता. यावेळी सरन्यायाधीश रमणा बोलत होते.



नरीमन हे वयाच्या ३७ वर्षीच सर्वोच्च न्यायालयात वरीष्ठ वकील म्हणून नियुक्त झाले होते. या पदासाठी ४५ वर्षे वयाची अट असतानाही नरीमन यांच्यासाठी तत्कालीन सरन्यायाशीश वेंकटाचलम यांनी नियमात बदल केला होता.

‘‘न्यायाधीशांनी समाजापासून फटकून न राहता, त्यांच्या कायम संपर्कात असायला हवे. न्यायाधीशांचे काम वकीलांपेक्षा अधिक अवघड असते. त्यांना प्रचंड वाचन आणि अभ्यास करावा लागतो.,’’ असे मत न्या. नरीमन यांनी व्यक्त केले.

Judges have very much work in courts says supreme court Judge

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात