जोधपूरच्या अरबाज मोहम्मद अफजलचे पाकिस्तानातल्या अमीनाशी ऑनलाईन निकाह!!

वृत्तसंस्था

जोधपूर : पाकिस्तानी सीमा हैदर आणि भारतीय अंजू यांची भारत आणि पाकिस्तानतली प्रेम प्रकरणे वेगवेगळ्या प्रकारे गाजत असताना राजस्थानातल्या जोधपूरच्या अरबाज मोहम्मद अफजलने पाकिस्तानी कराचीतल्या अमीनाशी ऑनलाईन निकाह केला आहे.Jodhpur’s Arbaaz Mohammad Afzal’s online Nikah with Pakistan’s Amina!!

मोहम्मद अफजल हे जोधपूर मधले एक बडे ठेकेदार आहेत. त्यांचा मुलगा अरबाजचे पाकिस्तान मधल्या अमीनाशी प्रेम जमले आणि त्यांनी ऑनलाईन निकाह केला. कराची मधल्या काजीने अमीना कडून कबूल है, हे नोंदविले.



मोहम्मद अफजल यांचे काही नातेवाईक पाकिस्तानात आहेत त्यांच्या माध्यमातून देखील लग्न जुळायला मदत झाल्याचे अफजल यांनी सांगितले व्हिसा न मिळाल्याने ऑनलाईन निकाह करावा लागला. पण आता अमीनाला व्हिसा मिळवून भारतात आणू असेही त्यांनी सांगितले.

पाकिस्तानातील सीमा हैदर भारतातली आणि तिने इथल्या सचिनशी लग्न केले. पण तिच्या भोवती हेरगिरीचे संशयाचे जाळे पसरले. तसेच राजस्थानातली अंजू पाकिस्तानमध्ये पोहोचली. तिने तिथे लग्न केल्याच्या बातम्या आल्या. तिच्या धर्मांतराच्या उलटसुलट बातम्या आल्या. ती तिथे श्रीमंत झाली. भारतात येऊन लवकरच आपल्या मुलांना घेऊन पाकिस्तानला जाणार अशाही बातम्या आल्या. या पार्श्वभूमीवर जोधपूरच्या अरबाज मोहम्मद अफजल याने पाकिस्तानातल्या अमीनाशी निकाह करणे हा चर्चेचा विषय ठरला आहे.

Jodhpur’s Arbaaz Mohammad Afzal’s online Nikah with Pakistan’s Amina!!

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात