प्रतिनिधी
मुंबई : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील राज्यभरातील 75000 रिक्त पदांची भरती करणार असल्याची घोषणा शिंदे फडणवीस सरकारने केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ऑनलाईन उपस्थितीत काल या 75000 पदांपैकी 2000 जणांना संपूर्ण महाराष्ट्रात नोकरीची प्रमाणपत्रे देण्यात आली. महाराष्ट्रात सर्व विभागीय कार्यालयांमध्ये याचे कार्यक्रम झाले. Job Opportunity : Recruitment of 75000 Posts in Maharashtra; How much space in which account
आता गृहविभाग, सार्वजनिक आरोग्य विभाग, जलसंपदा विभाग, महसूल व वन विभाग, वैद्यकीय शिक्षण विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, आदिवासी विभाग, सामाजिक न्याय विभाग या जागांसाठी लवकरच भरती निघणार आहे. सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे शासनाच्या 29 विभागातील 75000 पदभरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्य सरकारने या संदर्भातला शासकीय आदेश जारी केला आहे.
कोरोना महामारीच्या काळात राज्य सरकारने नोकरभरतीवर निर्बंध आणले होते. परंतु आता कोरोना काळ संपल्यावर शिंदे-फडणवीस सरकारने ही मर्यादा उठवली आहे. त्यामुळे १०० टक्के नोकर भरती होणार आहे.
कोणत्या विभागात अंदाजित किती नोकर भरती होणार ?
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App