Job Jihad : बांगला देशात हिंदूं विराेधात नाेकरी जिहाद, हजाराे जणांना राजीनामा देण्यास पाडले भाग

Job Jihad

विशेष प्रतिनिधी

ढाका : बांगला देशात शेख हसीना यांची राजवट उखटून टाकल्यानंतर मुस्लिम मूलतत्ववाद्यांचा हिंसाचार वाढला आहे. मंदिरे, हिंदूंची घरे यांच्या हल्ले हाेत आहेत. दुकाने, घरे पेटविली जात आहेत. महिलांवर बलात्कार हाेत आहेत. आता तर हिदूंविराेधात नाेकरी जिहाद सुरू झाला आहे. त्यांना शासकीय तसेच खासगी नाेकऱ्यांतून राजीनामे देण्यास भाग पाडले जात आहे. पाच  ऑगस्ट रोजी,बांगलादेशात सत्तांतर हाेऊन  पंतप्रधान शेख हसीना यांची हकालपट्टी झाली. त्यानंतर, इस्लामवाद्यांनी अशांततेचा फायदा घेऊन हिंदू समाजावर हिंसक हल्ले सुरू केले आहेत.  Job Jihad waged against Hindus in Bangladesh, forcing thousands to resign

तेव्हापासून, बांगलादेशातील अल्पसंख्याक हिंदूंना दररोज छळाचा सामना करावा लागत आहे, त्याचबराेबर बांगलादेशातील इस्लामवादी आता हिंदू विचारवंत आणि व्यावसायिकांना त्रास देत आहेत.  त्यांना त्यांच्या नोकरीचा राजीनामा देण्यास भाग पाडत आहेत. काहींना केवळ त्यांच्या धार्मिक ओळखीमुळे बांगलादेश सोडण्यासाठी दबाव आणला जात आहे.गेल्या काही दिवसांत बांगलादेशातील विविध जिल्ह्यांमध्ये अशा अनेक घटना समोर आल्या आहेत. बांगलादेशातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत हिंदू असलेल्या ६० शिक्षक, प्राध्यापक, सरकारी अधिकाऱ्यांना राजीनामा देण्यास भाग पाडण्यात आले आहे.

20 ऑगस्ट रोजी, इस्कॉनचे उपाध्यक्ष आणि प्रवक्ते राधारमण दास यांनी एक्स वर पोस्ट केली की बांगलादेशातील इस्लामवाद्यांच्या या पद्धतशीर लक्ष्याचा बळी गौतम चंद्र पाल नावाचा हिंदू शिक्षक बनला. गौतम चंद्र पाल  अजीमपूर शासकीय महाविद्यालयात रसायनशास्त्र शिकवतात.  त्यांना रसायनशास्त्राचे उत्कृष्ट शिक्षक म्हणून गौरविण्यात आले. त्यांना आता महाविद्यालयातील मुस्लिम विद्यार्थ्यांनी राजीनामा देण्यास भाग पाडले आहे.

19 ऑगस्ट रोजी सोनाली राणी दास नावाच्या एका हिंदू महिलेला राजीनामा देण्यास भाग पाडण्यात आले होते. त्या ढाका येथील होली रेड क्रिसेंट नर्सिंग कॉलेजमध्ये सहाय्यक प्राध्यापक होत्या. 19 ऑगस्ट रोजी एका शिक्षिकेला  मुस्लिम विद्यार्थ्यांनी काेंडून ठेवत पदाचा राजीनामा देण्यास भाग पाडले. त्या म्हणाल्या, माझ्याच विद्यार्थ्यांनी हे केले. मी अनेक विद्यार्थ्यांना शिकवले आहे. त्यामुळे अनेकजण अजूनही संपर्कात आहेत. माझ्या विद्यार्थ्यांनी माझ्यावर हल्ला केला यावर माझा विश्वास बसत नाही. त्यांनी मला काफीर म्हटले.

Job Jihad waged against Hindus in Bangladesh, forcing thousands to resign

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात