देशातील प्रत्येकाच्या हातात मोबाईल देण्यात महत्वाचे योगदान असलेल्या जिओ प्लॅटफॉर्मचे नाव आता जागतिक यादीतही आले आहे. जिओ प्लॅटफॉर्मनं टाईम मासिकाच्या सर्वात प्रभावशाली १०० कंपन्यांच्या यादीत स्थान मिळवले आहे.Jio Platform is one of the 100 most influential companies in the world
विशेष प्रतिनिधी
मुंबई : देशातील प्रत्येकाच्या हातात मोबाईल देण्यात महत्वाचे योगदान असलेल्या जिओ प्लॅटफॉर्मचे नाव आता जागतिक यादीतही आले आहे. जिओ प्लॅटफॉर्मनं टाईम मासिकाच्या सर्वात प्रभावशाली १०० कंपन्यांच्या यादीत स्थान मिळवले आहे.
भारतात डिजिटल परिवर्तन घडवून आणण्यासाठी उद्योगपती मुकेश अंबानी यांची कंपनी जिओ प्लॅटफॉर्मच्या नावाचा समावेश करण्यात आला आहे. गेल्या काही वर्षात जिओने भारतातील सर्वात मोठे ४ जी नेटवर्क तयार केले आहे.
Forbes 10 richest billionaires 2021 : मुकेश अंबानी नंतर गौतम अदानींचा जलवा , फोर्ब्सच्या यादीत टॉप 20 मध्ये प्रवेश
जिओ सर्वात कमी दराने ४ जी सेवा देत आहे. रिलायन्स जिओ केवळ ५ रुपए दरात १ जीबी डेटा देत आहे, असे टाईम मॅगझिननं म्हटले आहे.जगभरातील गुंतवणूकदार रिलायन्स इंडस्ट्रीजची डिजिटल कंपनी जिओ प्लॅटफॉर्ममध्ये गुंतवणूक करण्यास तयार आहेत.
ते रिलायन्स जिओच्या ४१ कोटी ग्राहकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहेत. गेल्या वर्षी जिओमध्ये २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक झाली आहे. जिओ प्लॅटफॉर्म फेसबुकच्या सहकायार्ने व्हॉट्सअॅपवर आधारित ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म विकसित करीत आहे.
त्याचवेळी, रिलायन्स जिओ स्वस्त ५ जी स्मार्टफोन बनविण्यासाठी गुगलसोबत काम करत आहे. भारतात डिजिटल ट्रान्सफॉर्मेशनसाठी जिओ प्लॅटफॉर्म लिमिटेडला इनोव्हेटर्स श्रेणीत स्थान देण्यात आलं आहे.
जिओ प्लॅटफॉर्म ही भारतातील एकमेव कंपनी आहे जिने नेटफ्लिक्स, निन्टेन्डो, मॉडर्ना, दि लेगो ग्रुप, स्पॉटिफाय यासारख्या इतर जागतिक कंपन्यांसह नाविन्यपूर्ण श्रेणीत स्थान मिळवलं आहे.
टाईम मॅगझिननुसार प्रासंगिकता, प्रभाव, नवीन करण्याची क्षमता, नेतृत्व, महत्वाकांक्षा आणि यश यासह मुख्य घटकांचे मूल्यांकन केल्यानंतर ही यादी तयार करण्यात आली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App