– उद्योजक रतन जिंदाल यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे प्रस्ताव
विशेष प्रतिनिधी
मुंबई : जिंदाल स्टेनलेस लिमिटेड महाराष्ट्रात ४२ हजार ८८६ कोटी रुपयांच्या गुंतवणूकीचा प्रकल्प उभा करणार आहे. यातून सुमारे साडे पंधरा हजार रोजगार संधी उपलब्ध होणार असल्याने, या प्रकल्पाचे महाराष्ट्रात स्वागत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे सांगितले.
जिंदाल स्टेनलेस लिमिटेडचे अध्यक्ष रतन जिंदाल यांनी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांची आज येथे सागर शासकीय निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. या भेटीत श्री. जिंदाल यांनी या प्रकल्पाच्या उभारणीचा प्रस्ताव सादर केला. या प्रकल्पाची उत्पादन क्षमता वार्षिक चार दशलक्ष टन इतकी असणार आहे.
या उद्योग समुहाने आणि श्री. जिंदाल यांनी महाराष्ट्राच्या क्षमतेवर दाखविलेला विश्वास महत्वाचा आहे. त्यामुळे या प्रकल्पाकरिता सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, असेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी या भेटी दरम्यान चर्चेत नमूद केले.
याप्रसंगी उद्योग विभागाचे सचिव पी. अन्बल्गन, जिंदाल समुहाचे वरिष्ठ अधिकारी आदी उपस्थित होते.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App