वृत्तसंस्था
नवी दिल्ली : जिहादी दहशतवादाचा भस्मासूर पाकिस्तान वर उलटला आहे. कारण आकडेवारीने सिद्ध केले आहे, की जिहादी दहशतवादी हल्ल्यांमध्ये पाकिस्तानने भारतापेक्षा सहापट जास्त सैनिक गमावले आहेत. ihadist threat at home, Pakistan lost 6 times more personnel to terror than India
पाकिस्तान हा देश जिहादी दहशतवादाचा जन्मदाता आणि निर्यातक. पण हाच जिहादी दहशतवाद पाकिस्तानवर उलटल्याचे आकडेवारी सांगते आहे. भारतात जिहादी दहशतवाद पाकिस्तानने माजवला असला तरी भारताने गेल्या दोन दशकांमध्ये त्याचा यशस्वी मुकाबला केला आहे. पण पाकिस्तानला विशेषतः त्याच्या वायव्य भागातल्या दहशतवादाशी लढताना नाकीनऊ येत आहेत आणि तिथेच त्याने भारतापेक्षा सहापट जास्त सैनिक गमावावे लागले आहेत. 2022 मध्ये जिहादी दहशतवादी हल्ल्यांमध्ये पाकिस्तानचे 282 सैनिक मारले गेले आहेत. इस्लामाबाद येथील सेंटर फॉर रिसर्च अँड सिक्युरिटी स्टडीज या बिगर सरकारी संस्थेने या संदर्भातला अहवाल तयार केला आहे. दहशतवादी हल्ल्यांची मुकाबला करताना भारताचे 47 सैनिक हुतात्मा झाले आहेत. हा आकडा दिल्लीतील इन्स्टिट्यूट फॉर कॉनफ्लिक्ट मॅनेजमेंट संस्थेने दिला आहे.
भारताचा पाकिस्तानच्या दहशतवादी कारवाया कमी झाल्या नाहीत. पण भारताचा दहशतवादाचा मुकाबला करण्याची क्षमता प्रचंड वाढली आहे. त्यामुळे 2001 मध्ये भारताने दहशतवादाशी मुकाबला करताना 883 सैनिक गमावले होते. त्यानंतर हा आकडा कमी होत गेल्याचे दिसून आले आहे त्या उलट पाकिस्तानला वायव्य सरहद्द प्रांतातील सरहद्दीवर मोठे नुकसान सोसावे लागले आहे आणि आता तर अफगाणिस्तानात तालिबानने कब्जा केल्यानंतर पाकिस्तान पुढचे जिहादी दहशतवादाचे आव्हान प्रचंड वाढले आहे.
भारतात माओवाद्यांचा हिंसाचार देखील वाढला असून त्याचा मुकाबला भारतीय सैन्य यशस्वीरित्या करते आहे. अर्थात या संदर्भातली आकडेवारी इन्स्टिट्यूट फॉर कॉनफ्लिक्ट मॅनेजमेंटने जाहीर केलेली नाही. पण तालिबाने अफगाणिस्तान कब्जा घेतल्यानंतर पाकिस्तानात दहशतवादी हल्ले वाढले आहेत. मात्र त्याची अधिकृत आकडेवारी पाकिस्तानने कधी जाहीर केलेली नाही. पण तालिबानच्या कब्जा नंतर वायव्य सरहद्दीवर कायम युद्ध सदृश परिस्थिती असते याकडे दुर्लक्ष करता येणार नाही आणि यातूनच पाकिस्तानी सैनिकांची प्रचंड मोठी हानी होत असल्याचे निरीक्षण इस्लामाबाद मधल्या संस्थेने नोंदवले आहे.
पाकिस्तानात डिसेंबर महिना डेडली डिसेंबर साबित झाला आहे कारण याच महिन्यात पाकिस्तानला फार मोठी सैनिक हानी सोसावी लागली आहे. खैबर पख्तूनवा आणि बलुचिस्तान प्रांतात तहरिक ए तालिबान पाकिस्तान (TTP) या दहशतवादी संघटनेने धुमाकूळ घातला आहे. तिच्या हल्ल्यात तब्बल 311 नागरिकांना प्राण गमवावे लागले आहेत.
आकडे बोलतात
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App