नागालँडच्या मुख्यमंत्र्यांना पाठिंबा दिल्याने JDU ने राज्य कार्यकारिणीवर केली ‘ही’ मोठी कारवाई

जेडी(यू) नागालँडचे प्रदेशाध्यक्ष आणि त्यांच्या एकमेव आमदाराने मुख्यमंत्री नेफियू रिओ यांची भेट घेतली आणि त्यांना पाठिंब्याचे पत्र दिले.

प्रतिनिधी

नितीश कुमार यांचा पक्ष जनता दल युनायटेड (जेडीयू)ने आपली नागालँड राज्य समिती तत्काळ प्रभावाने बरखास्त केली आहे. नागालँडच्या प्रदेशाध्यक्षांनी केंद्रीय नेतृत्वाशी सल्लामसलत न करता नागालँडच्या मुख्यमंत्र्यांना पाठिंब्याचे पत्र दिल्याचे पक्षाने म्हटले आहे.JDU sacks state executive for supporting Nagaland chief minister

जेडीयूचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि पक्षाच्या ईशान्येकडील प्रदेशांचे प्रभारी अफाक अहमद खान यांनी एका लेखी निवेदनात म्हटले आहे की, “केंद्रीय नेतृत्वाला कळले आहे की आमच्या पक्षाच्या नागालँड प्रदेशाध्यक्षांनी केंद्रीय पक्षाशी सल्लामसलत न करता नागालँडच्या मुख्यमंत्र्यांना समर्थनाचे पत्र दिले आहे. हे नियमाविरोधात आणि मनमानीपणाचे आहे. त्यामुळे पक्षाने नागालँड राज्य समिती तत्काळ बरखास्त केली आहे.


Maharashtra Budget : शिंदे-फडणवीस सरकारचा पहिला अर्थसंकल्प आज, अर्थमंत्री फडणवीस करणार सादर, मुख्यमंत्री म्हणाले- सर्व आश्वासने पूर्ण करू


याआधी बुधवारी जेडी(यू) नागालँडचे प्रदेशाध्यक्ष सेंचुमो लोथा आणि त्यांचे एकमेव आमदार झ्वेंगा सेब यांनी कोहिमा येथे मुख्यमंत्री नेफियू रिओ यांची भेट घेतली आणि त्यांना पाठिंब्याचे पत्र दिले. दोन्ही नेत्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना पुष्टी केली की त्यांनी मुख्यमंत्र्यांची कोहिमा येथील निवासस्थानी भेट घेतली आणि पक्षाचे समर्थन पत्र त्यांना सुपूर्द केले.

नागालँड विधानसभा निवडणुकीत एनडीपीपी-भाजपा युतीने 60 पैकी 37 जागा जिंकल्या. याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसने 7, एनपीपी 5, एनपीएफ 2, आरपीआय-ए 2, एलजेपी 2, जदयू 1 आणि चार अपक्ष विजयी झाले आहेत, या सर्वांनी आघाडीला पाठिंबा जाहीर केला आहे.

JDU sacks state executive for supporting Nagaland chief minister

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात