विशेष प्रतिनिधी
मुंबई : 2021 सालचा बहुचर्चित चित्रपट जयभीम पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर चित्रपटाचे कथानक आणि अभिनेता सूर्याचा अभिनय प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. आता चित्रपटाच्या चाहत्यांसाठी अभिमानस्पद बाब समोर आली आहे. चित्रपटाचे काही दृश्य स्करच्या अधिकृत यूट्यूब चॅनेलवर प्रदर्शित करण्यात आले आहेत.’Jaybheem’ is on Oscar authentic utube channel
विखे-पाटलांचा महसूल मंत्री थोरातांवर हल्लाबोल, कोणत्या दूध संघाने किती पैसे लाटले याचा भांडाफोड हिवाळी अधिवेशनात करणार
ऑस्करच्या व्हिडीओमध्ये चित्रपटाचे मेकिंग दाखवण्यात येत आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक टी. जे. ज्ञानवेल या व्हिडिओमध्ये चित्रपटाचे कथानक, त्याचे दिग्दर्शन आदी विषयी माहिती देत आहेत. विशेष म्हणजे या चित्रपटाला गोल्डन ग्लोब 2022 मध्येही प्रवेश मिळाला आहे.
सर्वोत्कृष्ट गैर-इंग्रजी भाषेतील चित्रपटाच्या श्रेणीत या चित्रपटाला नामांकन मिळाले आहे. ‘जय भीम’ हा चित्रपट अत्याचारित आणि जाती-आधारित भेदभावाच्या लढ्यावर आधारित कोर्टरूम ड्रामा आहे. या चित्रपटात सूर्या खऱ्या आयुष्यातील वकील चंद्रूच्या भूमिकेत आहे. वकील चंद्रू यांनी वंचित नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी आपले आयुष्य समर्पित केले आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App