विशेष प्रतिनिधी
मुंबई : कर्नाटक विधानसभेत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रमेश कुमार यांनी बलात्काराबाबत केलेल्या अश्लील वक्तव्यावर सर्वच स्तरातून टीका होत आहे.समाजवादी पक्षाच्या राज्यसभा खासदार जया बच्चन यांनी यांनी देखील या वक्तव्याचा तीव्र शब्दात निषेध केला आहे. याबाबत लाज वाटली पाहिजे असे म्हटले आहे. पक्षांने अशा लोकांवर कडक कारवाई करावी असही त्या म्हणाल्या. Jaya Bachchan lashes out at Congress leader for saying enjoy rape
जया बच्चन म्हणाल्या, ‘मी सभागृहात अनेकवेळा अशी प्रकरणे मांडली आहेत, पण आजपर्यंत कोणतीही कारवाई झालेली नाही. प्रसारमाध्यमांनी हा मुद्दा मांडावा, चर्चा करावी आणि लोकांसमोर आणावी. ते ज्या पक्षाचे आहेत , त्या पक्षाने रमेश कुमार यांच्यावर कठोर कारवाई करावी, जेणेकरून इतर कोणीही असे बोलण्याची हिंमत करू नये आणि अशा प्रकारे महिलांचा अपमान करू शकत नाही. अशा विधानाची लाज वाटते.
कठोर कारवाई झाली पाहिजे –
जया बच्चन म्हणाल्या, ‘मानसिकता बदलावी लागेल. असं बोलणाऱ्या त्यांच्या घरातल्या आई, बायको, बहिणी आणि मुलींनी काय विचार केला असेल, असं मला वाटतं. त्या पुढे म्हणाल्या, ‘भविष्यात कोणीही बोलू किंवा करू शकणार नाही, या विधानावर कठोर कारवाई झाली पाहिजे.’
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App