वृत्तसंस्था
मुंबई : Javed Akhtar प्रसिद्ध अभिनेत्री तथा भाजप खासदार कंगना रनौत व ख्यातनाम गीतकार जावेद अख्तर यांच्यात ५ वर्षांपासून सुरू असलेल्या न्यायालयीन वादावर अखेर पडदा पडला. कंगनाने जावेद अख्तर यांच्यासोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर करत ही माहिती दिली. या दोघांनीही तडजोड करून मानहानीचा खटला मागे घेतला.Javed Akhtar
अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या निधनानंतर २०२० मध्ये कंगनाने बॉलीवूडमधील काही मंडळींवर टीका केली होती. ‘जावेद अख्तर यांनी मला हृतिक रोशन प्रकरणात केस मागे घेण्यासाठी धमकावले होते. त्यांनी मला सगळ्यांसमोर हृतिकची माफी मागण्यासाठी २०१६ मध्ये दबाव टाकला होती. जावेद अख्तर हे बॉलीवूडमधील काही लोकांच्या मदतीने एक गँग चालवतात त्यामुळे बाहेरच्या लोकांना काम मिळत नाही,’ असाही आरोप कंगनाने केला होता. त्यामुळे कंगनावरही टीकेची झाेड उठली होती. या वक्तव्याविरोधात जावेद अख्तर यांनी अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला होता.
जावेदजी चांगले व्यक्ती, गैरसमजुतीतून माझे वक्तव्य : कंगना
कंगनाने सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली. त्यात म्हटले की, ‘आज मी व जावेद अख्तर यांनी मानहानी खटल्यात तडजोड केली. जावेदजी हे खूप चांगले व्यक्ती आहेत. त्यांच्याबद्दल माझे वक्तव्य गैरसमजातून केले होते. आता ते माझ्या सिनेमासाठी गाणीही लिहिणार आहेत.’
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App