क्रिकेटच्या इतिहासात असा विक्रम पहिल्यांदाच झाला आहे
नवी दिल्ली : टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला अखेर जे मिळायला हवे होते तेच मिळाले. जसप्रीत बुमराह आयसीसी कसोटी क्रमवारीत पहिल्या क्रमांकाचा गोलंदाज ठरला आहे. बुधवारी जाहीर झालेल्या कसोटी क्रमवारीत या उजव्या हाताच्या वेगवान गोलंदाजाने 3 खेळाडूंना पराभूत करून अव्वल क्रमांक मिळवला आहे.Jasprit Bumrah became the worlds number 1 test bowler
जसप्रीत बुमराह इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी क्रमवारीत चौथ्या क्रमांकावर होता. मात्र शेवटच्या दोन कसोटी सामन्यांमध्ये बुमराहने 15 विकेट घेत पहिल्या क्रमांकावर कब्जा केला. नंबर 1 बनून त्याने एक मोठा वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावावर केला.
जसप्रीत बुमराह कसोटीत नंबर 1 बनणे ही एक मोठी गोष्ट आहे. क्रिकेटच्या इतिहासातील तो एकमेव गोलंदाज आहे ज्याने प्रत्येक फॉरमॅटमध्ये नंबर 1 स्थान पटकावले आहे. बुमराह एकदिवसीय आणि टी-20 मध्ये नंबर 1 बनला होता आणि आता त्याने कसोटीतही हे स्थान गाठले आहे. इतकेच नाही तर बुमराह हा पहिला भारतीय वेगवान गोलंदाज आहे जो पहिल्या क्रमांकावर कसोटी क्रमवारीत पोहोचला आहे.
जसप्रीत बुमराहने आपल्याच संघातील दिग्गज गोलंदाज आर अश्विनची राजवट संपवली. अश्विन बराच काळ नंबर 1 कसोटी गोलंदाज राहिला. आता अश्विन तिसऱ्या स्थानावर घसरला आहे. कागिसो रबाडा दुसऱ्या तर पॅट कमिन्स चौथ्या स्थानावर आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App