जम्मू-काश्मीर : कुलगाममध्ये दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत ३ जवान शहीद, लष्कराचे सर्च ऑपरेशन सुरू


हलान जंगल परिसरात दहशतवादी असल्याच्या माहितीवरून लष्कराने शोध मोहीम सुरू केली होती

विशेष प्रतिनिधी

जम्मू-काश्मीर : कुलगाममध्ये दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत ३ जवान शहीद झाले आहेत. तर दहशतवाद्यांविरोधात लष्कराचे सर्च ऑपरेशन सुरू आहे. कुलगाम जिल्ह्यातील हलान जंगल परिसरात दहशतवादी असल्याच्या माहितीवरून लष्कराने शोध मोहीम सुरू केली होती, ज्यामध्ये कुलगाम पोलिसांचाही सहभाग होता. JammuKashmir 3 jawans killed in gunfight with terrorists in Kulgam

शोध मोहिमेदरम्यान शुक्रवारी (4 ऑगस्ट) संध्याकाळी सैनिक आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली, ज्यामध्ये 3 जवान जखमी झाले. जखमी जवानांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले, तेथे रात्री उशिरा त्यांचा मृत्यू झाला.

दहशतवाद्यांसोबत जवानांची चकमक अशा वेळी होत आहे, जेव्हा आज 5 ऑगस्टला जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवल्याला 4 वर्षे पूर्ण होत आहेत. यावेळी भाजपाने श्रीनगरमध्ये विजयी पदयात्रा काढण्याची घोषणा केली आहे.

JammuKashmir 3 jawans killed in gunfight with terrorists in Kulgam

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात