११.८२ लाख रुपयांची रोकडही जप्त करण्यात आली आहे; पाकिस्तानतून ही खेप पाठवण्यात आल्याचे केले कबुल
विशेष प्रतिनिधी
श्रीनगर : सीमेपलीकडून होणार्या अमली पदार्थांच्या तस्करीचा पर्दाफाश करताना पोलिसांनी दोन अमली पदार्थ तस्करांना अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातून तब्बल ७० कोटी रुपयांचे ११ किलो हेरॉईन आणि ११.८२ लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. ही खेप पाकिस्तानातून पाठवण्यात आल्याची कबुली दोघांनी चौकशीदरम्यान दिली आहे. Jammu and Kashmir Two Pakistani smugglers arrested with 11 kg of heroin worth Rs 70 crore
काश्मीरचे अतिरिक्त पोलिस महासंचालक (ADGP) विजय कुमार यांनी ट्विट केले की, ‘दोन सीमापार तस्कर सज्जाद बदाना आणि झहीर तंच यांना श्रीनगर पोलिसांनी कर्नाह कुपवाडा येथून अटक केली आहे. तस्करांकडून ११.८९ किलो हेरॉईन (आंतरराष्ट्रीय बाजारात ७० कोटी रुपये किमतीचे) आणि ११,८२,५०० रुपये रोख जप्त करण्यात आले आहेत.
अधिकाऱ्याने सांगितले की, तस्करांविरुद्ध राजबाग पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये एफआयआर दाखल करण्यात आला आहे. एडीजीपीने सांगितले की हे ड्रग पाकिस्तानातून आले होते.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App