प्रतिनिधी
जामखेड : महाराष्ट्राच्या राष्ट्रवादीच्या राजकारणात आघाडीची भूमिका बजावायला निघालेल्या आमदार रोहित पवारांना त्यांचा गृह मतदारसंघ जामखेड मध्येच मोठा धक्का बसला आहे. जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीत माजी मंत्री भाजपचे ज्येष्ठ नेते राम शिंदे यांच्या समर्थकांची अध्यक्षपदी वर्णी लागली आहे.Jamkhed apmc election, rohit Pawar candidate defeated for Chairmanship
जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत रोहित पवार आणि राम शिंदे या दोन्ही नेत्यांमध्ये जोरदार टक्कर झाली. दोन्ही गटांचे समसमान म्हणजे 9 – 9 उमेदवार निवडून आले. ईश्वर चिठ्ठीत भाजपचे उमेदवार शरद कारले विजय झाले, तर उपसभापतीपदी राष्ट्रवादीचे कैलास वराट विजयी झाले.
या निवडणुकीच्या काळातच राम शिंदे यांनी राष्ट्रवादीचे कर्जत तालुकाध्यक्ष काकासाहेब तापकीर यांना राष्ट्रवादीतून फोडून भाजपमध्ये घेतले आणि रोहित पवारांना धक्का दिला होता. काकासाहेब तापकिरांच्या भाजप प्रवेशाचा पक्षाला फायदा झाला. जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीत रोहित पवारांचा वर्चस्व निर्माण करण्याचा मनसूबा उधळला गेला.
रोहित पवार हे राष्ट्रवादीचे आजोबांच्या पाठिंब्याने मोठी भूमिका बजावायला पुढे येत आहेत. पण त्यांना आपल्या मतदारसंघातच कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत भाजपला रोखण्यात अपयश आले. ईश्वर चिठ्ठीतही अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत त्यांच्यावर बाजू उलटली आणि भाजपचाच उमेदवार विजयी झाला.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App