वृत्तसंस्था
लंडन : पाकिस्तानने चोरलेले काश्मीर भारत आणि परत मिळवले, की तो प्रश्न ताबडतोब आणि कायमचा सुटेल असे “आश्वासन” मी सगळ्यांना देतो, अशा शब्दांमध्ये परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी पाकिस्तानी पत्रकाराला सुनावले.
लंडनमधल्या चॅंथम हाऊस मध्ये पत्रकार आणि बुद्धिजीवींशी साधलेल्या संवादात जयशंकर यांनी अनेक वादग्रस्त मुद्द्यांवर स्पष्ट उत्तरे दिली. यातलेच एक स्पष्ट उत्तर काश्मीर प्रश्नावर होते निसार नावाच्या पाकिस्तानी पत्रकाराने जयशंकर यांना काश्मीर संदर्भातला प्रश्न विचारला त्यावेळी त्याने भारतावरच काश्मीर बेकायदेशीर रित्या बळकावल्याचा आरोप केला. पण जयशंकर यांनी अतिशय शांतपणे निसार यांचा प्रतिवाद करत पाकिस्तान वरच बाजू उलटवून टाकली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात मैत्री आहे. त्या मैत्रीचा वापर नरेंद्र मोदी काश्मीर प्रश्न सोडवण्यासाठी करतील का??, असा खोचक सवाल निसार यांनी केला होता. त्यावर उत्तर देताना जयशंकर म्हणाले, कुठल्याही तिसऱ्या पार्टीचे पार्टीचा हस्तक्षेप भारताला मान्य नाही. ते भारताचे धोरण कायम आहे, पण काश्मीर मधून 370 कलम हटवून भारताने चांगले काम केले, तिथे आर्थिक गतिविधि वाढवली, सामाजिक न्याय आणला, समाजातल्या सर्व घटकांना राजकीय आणि प्रशासकीय प्रक्रियेत सामावून घेतले, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका घेऊन लोकप्रतिनिधींमार्फत कारभार सुरू केला, या तीन गोष्टींमुळे काश्मीर मध्ये सकारात्मक बदल झाल्याचे जगाने पाहिले. आता फक्त पाकिस्तानने चोरलेले काश्मीर भारताने परत मिळवले, की काश्मीरचा प्रश्न संपूर्णपणे सुटेल, असे मी आश्वासन देऊ शकतो, अशा परखड शब्दांमध्ये जयशंकर यांनी पाकिस्तानी पत्रकाराला गप्प केले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App