विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्धबंदी व्हावी म्हणून आपण हस्तक्षेप केला. दोन्ही देशांना व्यापाराची लालूच दाखविली, असा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 25 वेळा दावा केला. पण भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी एका झटक्यात लोकसभेत तो दावा खोडून काढला. Jaishankar
22 एप्रिल ते 17 जून या कालावधीत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना एकही कॉल आला नव्हता. भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यानच्या युद्धकाळात अमेरिकेशी व्यापार हा विषय देखील चर्चेला आला नव्हता, असा स्पष्ट खुलासा जयशंकर यांनी लोकसभेतल्या चर्चेला उत्तर देताना केला. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांनी 25 वेळा केलेली बडबड एका झटक्यात वाया गेली.
– अमित शाहांचा हस्तक्षेप
जयशंकर यांचे परखड उत्तर ऐकल्यावर काँग्रेस सह सगळ्या विरोधकांनी लोकसभेत गोंधळ घालायचा प्रयत्न केला. त्यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी हस्तक्षेप केला. भारताचे शपथ घेतलेले परराष्ट्रमंत्री लोकसभेत निवेदन करत आहेत. त्यांच्यावर विरोधकांचा विश्वास नाही, पण दुसऱ्या देशातल्या नेत्यांवर विश्वास आहे. त्यांच्या पक्षामध्ये परदेशातल्या नेत्यांना किती महत्त्व आहे, हे आम्हाला माहिती आहे, पण ते महत्त्व लोकसभेच्या सगळ्या सभागृहावर लादायचे काही कारण नाही, असे अमित शाह यांनी ठणकावले. ते परदेशांमधल्या नेत्यांवर विश्वास ठेवतात म्हणूनच त्यांना विरोधी बाकांवर बसावे लागले आणि पुढची 20 वर्षे तिथेच बसून राहतील, असा टोमणाही अमित शाह यांनी काँग्रेस सकट विरोधकांना मारला.
– जयशंकर यांनी सांगितला घटनाक्रम
जयशंकर यांनी सर्व घटनाक्रम विशद करून सांगितला. 9 मे या दिवशी अमेरिकेचे उपाध्यक्ष जे. डी. व्हान्स यांचा फोन पंतप्रधान नरेंद्र मोदींना आला पाकिस्तान मोठा हल्ला चढविण्याच्या बेतात असल्याचे ते म्हणाले त्यावर पंतप्रधानांनी त्यांनी हल्ला केला तर त्यांना तेवढ्याच जोरकसपणे प्रत्युत्तर देऊ असा प्रतिइशारा व्हान्स यांच्या करवी पाकिस्तानला दिला. पाकिस्तानी फौजेने हल्ला केला, पण भारतीय फौजींनी तो हल्ला उधळून लावला.
22 मे या दिवशी डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधानांना फोन केला पण त्यावेळी फक्त पहलगाम हल्ल्याचा उल्लेख झाला होता. त्यानंतर 17 जून रोजी डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधानांना पुन्हा फोन केला तुम्ही कॅनडातून वॉशिंग्टनला येऊ शकता का??, एवढे विचारण्यासाठीच तो फोन होता. त्यावेळी पंतप्रधानांनी ते शक्य नसल्याचे सांगितले होते, याची आठवण जयशंकर यांनी लोकसभेला करवून दिली. या सगळ्या संभाषणातून जयशंकर यांनी डोनाल्ड ट्रम्प यांचा 25 वेळा केलेला दावा एका झटक्यात उधळून लावला.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App