नाशिक : आज 30 जुलै 2025. ही तारीख भारतीय राजकीय इतिहासाच्या पानांवर नोंदली गेली कारण पप्पू नंतर राहुल गांधींची आज झाली “बढती”; राज्यसभेतून मिळाली “चायना गुरू”ची पदवी!!
ऑपरेशन सिंदूरच्या चर्चेदरम्यान हे आज राज्यसभेत घडले. परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी या चर्चेत भाग घेतला आणि त्यावेळी त्यांनी राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खर्गे या दोघांना उद्देशून चायना गुरु असे शब्द वापरले त्यामुळे संपूर्ण सभागृहात हास्याची लकेर पसरली.
राहुल गांधींना आतापर्यंत सगळ्या देशाने पप्पू म्हणून हिणवले होते. परंतु राहुल गांधींचा परफॉर्मन्स हळूहळू सुधारला आणि ते विरोधी पक्षनेते पदापर्यंत येऊन पोहोचले. याची दखल अखेर मोदी सरकारला घ्यावी लागली आणि म्हणूनच परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांच्या मुखातून त्यांना चायना गुरु (China Guru) ही पदवी द्यावी लागली.
ऑपरेशन सिंदूर वरल्या चर्चेमध्ये राहुल गांधींनी जे चीनविषयक भाषण केले होते, त्या भाषणाला जयशंकर यांनी राज्यसभेतून उत्तर दिले. पाकिस्तान आणि चीन यांच्यातली मैत्री आणि सहकार्य वाढत आहे. परंतु आपले सरकार झोपले आहे, असा आरोप राहुल गांधींनी केला होता.
त्यांना प्रत्युत्तर देताना जयशंकर म्हणाले :
माझे चीन विषयाचे ज्ञान थोडे कमी असू शकते. जरी मी परराष्ट्र सेवेत 40 वर्षे राहिलो आणि चीनमध्ये सगळ्यात जास्त काळ राजदूत राहिलो, तरी माझे चीन विषयाचे ज्ञान अपुरे असू शकते. कारण मला ऑलिंपिक मध्ये जाऊन चिनी शिकण्याची संधी मिळाली नाही. कारण मला त्यांनी निमंत्रणच दिले नाही. कारण मी “स्पेशल पर्सन” नव्हतो, पण काही लोक “स्पेशल पर्सन” असल्यामुळे त्यांना ऑलिंपिक मध्ये जाऊन चिनी शिकण्याची संधी मिळाली. म्हणूनच ते आज “चायना गुरु” बनून चीन विषयाचे ज्ञान वाटप फिरत आहेत. ते तिथे ऑलिंपिकला गेले होते ते अनेकांना भेटले. त्यांनी एका गोष्टीवर सही केली त्याविषयी मी आता बोलत नाही.
– पण ऑलिंपिक मध्ये जाऊन सुद्धा त्यांचे चिनी शिकायचे थोडे राहिले म्हणून त्यांनी भारतातल्या चिनी राजदूताला घरी बोलवून त्याच्याकडून प्रायव्हेट ट्युशन घेतली.
– पण त्यांनी उपस्थित केलेल्या चीन आणि पाकिस्तान यांच्या मैत्रीविषयी मात्र काही गोष्टी सांगतो. या गोष्टी 1967 मध्ये सुरू झाल्या. कारण त्यावर्षी चीन आणि पाकिस्तानी यांच्या अण्वस्त्र विषयक मैत्री करार झाला. त्यानंतर टप्प्याटप्प्याने त्यांची मैत्री वाढत गेली कारण आपण पाकिस्तान व्याप्त काश्मीर नावाचा विषय आयता त्यांच्या हातात देऊन टाकला होता त्यावेळी सरकारे कुणाची होती?, हे सगळ्या देशाला आणि सभागृहाला माहिती आहे.
– आज हे चायना गुरू चीन विषयक इशारा देत आहेत. जणू काही इतरांना काही माहितीच नाही आणि आपणच इशारा देतो आहोत, असा आव त्यांनी आणलाय
– पण चीन आणि पाकिस्तान यांच्यातली मैत्री आणि गाढ संबंध यांची पुरती माहिती सरकारला आहे सरकार त्या संदर्भात गंभीर होऊन त्या मैत्रीला छेद देण्यासाठी व्यवस्थित काम करत आहे नवे मित्र जोडत आहे पण हे सगळे सुरू असताना हे चायना गुरु तिसरीच्या क्लासमध्ये झोपले होते, याकडे मी सभागृहाचे लक्ष वेधू इच्छितो.
जयशंकर यांनी अशा प्रकार शब्दांमध्ये काँग्रेस आणि राहुल गांधींचा “क्लास” घेतला, पण त्या पलीकडे जाऊन जयशंकर यांनी राहुल गांधींची पप्पू नावाच्या “क्लास” मधून बढती करून त्यांना “चायना गुरू” ही नवी पदवी देऊन गौरवान्वित केले. त्यामुळे “चायना गुरू” सोशल मीडियावर प्रिंटिंग मध्ये आला. अनेकांनी त्याची मजा लुटायला सुरुवात केली.
काँग्रेसचे खासदार बनण्यापासून राहुल गांधींचे गेली 15 – 20 वर्षांचे राजकारण पप्पू या नाव होते फिरत होते. त्यांना जसे अनेक जण चिडवत होते, तसेच त्यांच्या बाजूनेही अनेक जण लढत होते. पण कुणालाही राहुल गांधींसाठी नवे नाव सुचत नव्हते ते जयशंकर यांनी शोधून काढले आणि त्यांना नवे “चायना गुरू” असे नाव दिले. त्यामुळे राहुल गांधींच्या राजकीय जीवनातला नवीन अध्याय सुरू झाला. 30 जुलै 2025 ही तारीख इतिहासात नोंदवली गेली.
तसेही राहुल गांधी मोदी सरकारच्या मेक इन इंडियाची खिल्ली उडवताना चिनीमालाची एजंटगिरी करतच होते. त्याला आता आता “चायना गुरू” या पदवीने नवी झळाळी मिळाली.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App