जयराम रमेश यांनी बिहारच्या निवडणुकीत बेलछीची आठवण काढणे ठीक आहे; पण सध्याच्या काँग्रेस नेतृत्वामध्ये ते spirit उरलेय का??

नाशिक : काँग्रेसचे बुद्धिमान मुख्य प्रवक्ते जयराम रमेश यांनी इंदिरा गांधींना त्यांच्या पुण्यतिथी निमित्त आदरांजली वाहताना अत्यंत चतुराईने बिहार विधानसभा निवडणुकीची पार्श्वभूमी निवडली आणि त्यांनी निवडकपणे बिहार मधल्या बेलछीची आठवण आपल्या सोशल मीडिया हँडल वरून शेअर केली. पण त्यामुळेच जयराम रमेश यांनी बेलचीची आठवण काढणे ठीक आहे पण सध्याच्या काँग्रेस नेतृत्वामध्ये ते spirit उरले आहे का??, असा सवाल विचारायची वेळ आली.

इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या राजकीय कर्तृत्वाचा अनेक आठवणी काढणे शक्य असताना जयराम रमेश यांनी नेमकी बेलछीची आठवण काढली. बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे पुनरुज्जीवन कसे होत आहे हे दाखविण्याचा त्यातून प्रयत्न केला.

आणीबाणी संपुष्टात आणल्यानंतरच्या 1977 च्या निवडणुकीत इंदिरा गांधींचा पराभव झाला होता. इंदिरा गांधी राजकीय दृष्ट्या संपल्या आता त्यांची राजवट पुन्हा कधीही येणार नाही असा आव त्यावेळच्या जनता पार्टीच्या सत्ताधाऱ्यांनी आणला होता तसा प्रचार सुद्धा त्यांनी चालविला होता परंतु इंदिरा गांधी राजकीय दृष्ट्या पुनरागमनाची वाट पाहत होत्या. पण त्यांना तशी संधी मिळत नव्हती पण म्हणून त्या गप्पा बसलेल्या नव्हत्या. त्यांच्या राजकीय हालचाली चालूच होत्या.

इंदिरा गांधींनी साधली संधी

तेवढ्यात बिहार मधल्या बेलछीतून दलित हत्याकांडाची बातमी आली आणि इंदिरा गांधींनी त्या बातमीत राजकीय पुनरागमनाची संधी शोधली. त्यावेळी बिहारची अवस्था एवढी मागास होती की बेलची गावाकडे जाण्यासाठी साधा रस्ताही नव्हता परंतु तरी इंदिरा गांधी त्या गावाला गेल्या. साठी त्यांनी हत्तीच्या पाठीवर बसून प्रवास केला होता. तिथे जाऊन त्या दलित ग्रामस्थांना भेटल्या. त्यांचे अश्रू पुसले. त्यांना मदतीचे आश्वासन दिले. या घटनेची चर्चा आंतरराष्ट्रीय पातळीवर झाली. सत्ताधाऱ्यांपैकी कोणालाही बेलची गावात जायचे सुचले नाही. ते इंदिरा गांधींना सुचले. त्या तिथे जाऊन आल्या. तिथून त्यांनी इंदिरा काँग्रेसच्या पुनरुज्जीवनाची सुरुवात केली. त्यानंतर अवघ्या दोन वर्षांमध्ये इंदिरा गांधी प्रचंड बहुमतानिशी सत्तेवर परतल्या होत्या. पण त्या दोन वर्षांमध्ये त्यांनी संपूर्ण देशभर फिरून पक्षाला पुन्हा उभे केले होते. आपले नेतृत्व संपले नाही. आपले नेतृत्व तितकेच तडफदार पणे संपूर्ण देशभर प्रस्थापित होऊ शकते हे त्यांनी दाखवून दिले होते.

नव्या नेतृत्वाच्या कर्तृत्वाचे काय??

जयराम रमेश यांनी बेलछीची आठवण काढून बिहारमध्ये काँग्रेसचे पुनरुज्जीवन असेच होऊ शकते, असे सूचकपणे सांगितले. परंतु सवाल त्यापलीकडेच आहेत. इंदिरा गांधींनी बेलछी दौऱ्याची संधी साधून काँग्रेसमध्ये पुन्हा जान फुंकली हे खरे, पण त्यासाठी त्यांनी मोठे कष्ट उपसले होते. काँग्रेसमधल्या सगळ्या जुन्या धेंडांना बाजूला काढून प्रत्येक ठिकाणी छोटे-मोठे नवे नेतृत्व उभे केले होते. कार्यकर्त्यांना प्रेरणा दिली होती. तशाच प्रकारचे कर्तृत्व आजचे काँग्रेसचे नेतृत्व दाखवते आहे का??, तेवढी या काँग्रेस नेतृत्वाची क्षमता आहे का??, हे खरे सवाल आहेत. अन्यथा नुसती इंदिरा गांधींच्या बेलछी दौऱ्याची आठवण काढून उपयोगाची नाही. किंवा त्यांच्या कर्तृत्वाचा नुसता हवाला देऊन उपयोगाचे नाही, तर त्यांच्या पावलावर पाऊल टाकून काँग्रेसच्या नेतृत्वाने तेवढे कष्ट उपसण्याची तयारी दाखविली आणि तसे कष्ट केले, तरच काँग्रेसचे पुनरुज्जीवन शक्य आहे. अन्यथा इंदिरा गांधी हत्तीवर बसल्याचे फोटो नुसतेच खाली उभे राहून सोशल मीडियावर टाकून काही फायदा होणार नाही.

Jairam Ramesh in Bihar elections Indiara Gandhi remember

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात