गेल्या वर्षी एप्रिलमध्ये त्यांनी भाजप सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसमध्ये दाखल झालेले जगदीश शेट्टर यांनी पुन्हा भाजपमध्ये ‘घरवापसी’ केली आहे.Jagdish Shettar left Congress and joined BJP
दिल्लीतील भाजप मुख्यालयात माजी मुख्यमंत्री-वरिष्ठ पक्ष नेते बीएस येडियुरप्पा आणि प्रदेश भाजप अध्यक्ष बीवाय विजयेंद्र यांच्या उपस्थितीत जगदीश शेट्टर यांनी भाजपमध्ये पुन्हा प्रवेश केला. गेल्या वर्षी एप्रिलमध्ये त्यांनी भाजप सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
वृत्तसंस्था एएनआयशी बोलताना कर्नाटकच्या माजी मुख्यमंत्र्यांनी सांगितले की त्यांनी केंद्रीय गृहमंत्री आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते अमित शहा यांची भेट घेतली आहे.
कोण आहेत जगदीश शेट्टर
जगदीश शेट्टर हे माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांच्यासह कर्नाटकातील प्रमुख लिंगायत नेते आहेत. शेट्टर यांचा जन्म कर्नाटकातील केरूर येथे झाला. 1980 च्या दशकात त्यांनी जनता पक्षातून राजकीय प्रवासाला सुरुवात केली. त्यानंतर 1994 मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. 2012 ते 2013 दरम्यान सहा वेळा भाजपचे आमदार असलेले कर्नाटकचे मुख्यमंत्री होते.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App