सुप्रीम कोर्टात जॅकलिनला मोठा झटका! 200 कोटींच्या मनी लॉन्डरिंग प्रकरणात दिलासा नाही; ईडीची कारवाई सुरूच

Jacqueline

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : बॉलीवूडची ग्लॅमरस अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस हिला सुप्रीम कोर्टाने मोठा धक्का दिला आहे. 200 कोटी रुपयांच्या मनी लॉन्डरिंग प्रकरणात तिने दाखल केलेली याचिका फेटाळण्यात आली आहे. त्यामुळे ईडीने दाखल केलेली चार्जशीट आणि ट्रायल कोर्टातील सुनावणी आता अधिक वेगाने सुरू होणार आहे. Jacqueline

ईडीच्या चार्जशीटनुसार, जॅकलिनने कुख्यात ठग सुकेश चंद्रशेखर याच्याकडून महागडे दागिने, हिरेजडित भेटवस्तू, आलिशान घोडे आणि परदेश दौरे यांचे खर्च घेतले. तपास यंत्रणांचे म्हणणे आहे की, सुकेशच्या काळ्या कारवायांची माहिती असूनही जॅकलिन त्याच्याशी संपर्क ठेवत होती.



जुलै 3 रोजी दिल्ली हायकोर्टानेही तिची मागणी फेटाळली होती. सुप्रीम कोर्टाने आज त्याला शिक्कामोर्तब करत फक्त ट्रायल कोर्टालाच तिच्या भूमिकेचा निर्णय घेण्याचा अधिकार असल्याचे स्पष्ट केले. यामुळे जॅकलिनसमोर आता मोठे कायदेशीर आव्हान उभे राहिले आहे.

तिने मात्र सर्व आरोप नाकारले आहेत. तिच्या म्हणण्यानुसार, ती निष्पाप आहे आणि सुकेशच्या गुन्हेगारी भूतकाळाबद्दल तिला काहीच माहिती नव्हती. तिने तपास रद्द करण्याची मागणी केली होती, मात्र ती फेटाळली गेली आहे.

सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयामुळे आता ट्रायल कोर्टात जॅकलिनला सामोरे जावे लागणार आहे. ईडीकडे आधीच पुरावे आणि साक्षीदारांची यादी आहे. त्यामुळे हा खटला आता अधिक गाजणार आहे.

Jacqueline suffers a big setback in the Supreme Court

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात