ISRO : अंतराळात वाढला भारताचा दबदबा! ‘इस्रो’ने प्रक्षेपित केले सिंगापूरचे दोन उपग्रह

 जाणून घ्या, काय आहे या दोन उपग्रहांचे वैशिष्ट?

विशेष प्रतिनिधी

श्रीहरीकोटा – भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ने शनिवारी (२२ एप्रिल) आपल्या आणखी एका मोठ्या मोहिमेद्वारे पोलर सॅटेलाइट लॉन्च व्हीकल(PSLV) प्रक्षपित केले आहे. या क्षेपणास्त्राने सिंगापुरचे दोन मोठे उपग्रह आणि इन-हाउस  प्लॅटफॉर्मसह उड्डाण केले. ISRO Launched Two Singaporean Satellites

आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून दुपारी 2:19 वाजता PSLV-C55 मिशनचे प्रक्षेपण करण्यात आले. PSLV चे हे 57 वे उड्डाण आहे आणि PSLV कोर अलोन कॉन्फिगरेशनचा वापर करण्याचे हे 16 वे मिशन आहे. या मोहिमेला TLEOS-2 असे नाव देण्यात आले आहे.

इस्रोनेही आपल्या ट्विटर हँडलवर सिंगापूरच्या दोन उपग्रहांच्या प्रक्षेपणाची माहिती दिली होती. इस्रोने सांगितले होते की शनिवारी श्रीहरिकोटा येथून PSLV रॉकेट PSLV-C55 सिंगापूरचा 741 किलो वजनाचा उपग्रह TeLEOS-2 आणि 16 kg Lumilite-4 उपग्रह कक्षेत पाठवेल.

जाणून घ्या काय आहे वैशिष्ट?-

TeLEOS-2 हा रडार उपग्रह आहे. सिंगापूरच्या संरक्षण विज्ञान आणि तंत्रज्ञान संस्थेने ते तयार केले आहे. हा उपग्रह सोबत सिंथेटिक अपर्चर रडार घेऊन जाणार असून तो दिवसरात्र हवामानाची अचूक माहिती देईल.

दुसरा उपग्रह LUMELITE-4 आहे, तो 16 किलो वजनाचा प्रगत उपग्रह आहे. हे अतिशय उच्च वारंवारता डेटा एक्सचेंज सिस्टम प्रदर्शित करण्यासाठी विकसित केले गेले आहे. सिंगापूरच्या ई-नेव्हिगेशन सागरी सुरक्षेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि जागतिक शिपिंग समुदायाला लाभ देण्यासाठी या उपग्रहाची रचना करण्यात आली आहे.

ISRO Launched Two Singaporean Satellites

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात