Israel-Hamas War : युद्धाच्या पार्श्वभूमीवर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी मोदींना केला फोन

पंतप्रधान मोदींनी दिली माहिती, जाणून घ्या काय म्हणाले…

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : इस्रायलवर हमासच्या दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी फोनवर चर्चा केली. इस्रायलच्या पंतप्रधानांनी मोदींना हमास दहशतवाद्यांविरोधात सुरू असलेली मोहीम आणि देशातील परिस्थितीबद्दल माहिती दिली आहे. युद्धाच्या चौथ्या दिवशी इस्रायली लष्कराने गाझा पट्टीत हमासच्या दहशतवाद्यांविरोधात कारवाई तीव्र केली आहे. Israel Hamas War In the wake of the war Israeli Prime Minister Benjamin Netanyahu called Modi

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी आज(मंगळवार) दुपारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फोन केला. इस्रायलच्या पंतप्रधानांनी मोदींना युद्धाशी संबंधित ताजी माहिती दिली आहे. यावेळी मोदींनी इस्रायलला पाठिंबा असल्याचे सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे. पंतप्रधान मोदींनी लिहिले की, पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांचा फोन कॉल आणि सद्यस्थितीबाबत अपडेट दिल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. या कठीण काळात भारतीय जनता इस्रायलच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. भारत दहशतवादाच्या सर्व प्रकारांचा आणि प्रकटीकरणाचा तीव्र आणि स्पष्टपणे निषेध करतो.

Israel Hamas War In the wake of the war Israeli Prime Minister Benjamin Netanyahu called Modi

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात