वृत्तसंस्था
बैरुत : इस्रायलने ( Israel fires ) सोमवार, 23 सप्टेंबर रोजी लेबनॉनवर 300 हून अधिक क्षेपणास्त्रे डागली. या हल्ल्यात आतापर्यंत 182 जणांचा मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर 700 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. हल्ल्यानंतर लेबनॉनमधील शाळा दोन दिवसांसाठी बंद ठेवण्यात आल्या आहेत. लोक सुरक्षित स्थळी जाताना दिसले. त्यामुळे अनेक शहरात वाहतूक कोंडी होत आहे.
सलग चौथ्या दिवशी इस्रायलचा हा क्षेपणास्त्र हल्ला आहे. या काळात लेबनीज शहरांवर 900 हून अधिक क्षेपणास्त्रे डागण्यात आली, ज्यात आतापर्यंत 250 हून अधिक लोक मारले गेले आहेत. टाईम्स ऑफ इस्रायलच्या वृत्तानुसार, आयडीएफचे प्रवक्ते रिअर ॲडमिरल डॅनियल हगरी यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ जारी केला आहे.
प्रवक्ता हगारी यांनी व्हिडिओमध्ये म्हटले होते- आम्ही लेबनीज नागरिकांना त्यांच्या स्वतःच्या सुरक्षिततेसाठी धोक्याच्या क्षेत्रापासून ताबडतोब दूर जाण्याचा सल्ला देतो. इस्रायली लष्कर हिजबुल्लाहवर आणखी प्राणघातक हल्ले करणार आहे.
हगारी यांनी सांगितले की, हिजबुल्लाने घरे आणि इमारतींमध्ये शस्त्रे साठा केली आहेत. जर तुम्ही अशा इमारतीत असाल जिथे शस्त्रे असतील तर ती लवकरात लवकर सोडा. ते म्हणाले की, लेबनॉनमधील सर्व नेटवर्क आणि प्लॅटफॉर्मवर हा संदेश अरबी भाषेत पाठवला जात आहे
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App