वृत्तसंस्था
वाराणसी : काशी विश्वनाथ धाम परिसरातील ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षणाचे आदेश देणारे न्यायाधीश रवीकुमार दिवाकर यांना धमकी भरले पत्र आले आहे. इस्लामिक आगाज मुव्हमेंटचा प्रमुख काशिफ अहमद सिद्दिकी याच्या लेटरहेरवर हे धमकी भरले पत्र लिहिले आहे. तुम्ही ज्ञानवापी मशिदी संदर्भात निडर राहून निकाल द्या. कट्टरतावादी तुमच्यावर हल्ले करतील. पण तुमचे कुटुंब सुरक्षित राहील, अशी धमकी भरली भाषा या पत्रात वापर आली आहे. Islamic orders threaten judges ordering polls
न्यायाधीश रवीकुमार दिवाकर यांना धमकीचे पत्र आल्यानंतर उत्तर प्रदेश पोलिस यंत्रणा हायर हाय अलर्ट वर असून पोलिसांनी न्यायाधिश रविकुमार यांची सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे. या पत्राची चौकशी आणि तपास देखील पोलिसांनी सुरू केला आहे.
आपल्या कुटुंबियांना धोका असल्याची टिपणी न्यायाधीश रवीकुमार दिवाकर यांनी यापूर्वीही केली होती. परंतु आता प्रत्यक्ष इस्लामी आगाज मुव्हमेंटच्या लेटरहेड वरून धमकीचे पत्र आल्याने न्यायाधीश दिवाकर यांच्या गांभीर्य लक्षात येते.
ज्ञानवापी मशीद, अयोध्येचे राम मंदिर यांच्या सारख्या संवेदनशील खटल्यांमध्ये न्यायाधीश आणि वकिलांना सरकारने आधीच सुरक्षा व्यवस्था पुरवली आहे. ज्ञानवापी मशिदीचा मुद्दा तापल्यानंतर काही मुस्लीम कट्टरतावादी संघटनांनी न्यायाधिशांवर आक्षेप घेऊन ते मूर्तिपूजकांचे पक्षपाती असल्याचा आरोप केला होता.
– टाडा न्यायालयाच्या न्यायाधीशांनाही पूर्वी धमक्या
1993 च्या बॉम्बस्फोट खटल्याचे खटल्याची सुनावणी घेणाऱ्या आणि निकाल देणार्या विशेष टाडा न्यायालयाच्या न्यायाधीशांना देखील यापूर्वी धमक्या आल्या होत्या. मुंबई दंगलीची चौकशी करणाऱ्या न्यायमूर्ती श्रीकृष्ण यांना देखील इस्लामिक कट्टरतावाद धमक्या दिल्या होत्या. आता ज्ञानवापी मशिदीचा विषय ऐरणीवर आला असताना न्यायाधीश रवीकुमार दिवाकर यांना इस्लामिक कट्टरतावाद्यांनी धमक्या दिल्या आहेत. पोलीस या धमक्यांचा तपास करत आहेत.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App