१६-१८ वर्षांच्या मुलांना लव्ह जिहादसाठी तयार करायचे
विशेष प्रतिनिधी
पोरबंदर : गुजरात एटीएसच्या पथकाने पोरबंदरमध्ये मोठी कारवाई केली आहे. एटीएसने ISIS मॉड्यूलचा पर्दाफाश केला आणि पोरबंदरमधून एका महिलेसह पाच जणांना अटक केली. गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली आहे. कारवाई पूर्ण झाल्यानंतर एटीएस अधिकृत घोषणा करेल. आज सायंकाळपर्यंत माध्यमांना अधिकृत माहिती दिली जाऊ शकते, असे मानले जात आहे. ISIS module busted in Gujarat five arrested including a woman from Porbandar
दहशतवादी कारवायांसंदर्भात त्यांची रात्रभर चौकशी करण्यात आली. यादरम्यान ते आयएसआयएस मध्ये सामील होण्यासाठी पळून जाण्याच्या तयारीत होते आणि गेल्या एक वर्षापासून एकमेकांच्या संपर्कात होते, अशी माहिती मिळाली. त्यांना पाकिस्तानात बसलेल्या दहशतवाद्यांच्या म्होरक्यांकडून सूचना दिल्या जात होत्या.
एटीएसने पकडलेल्या महिलेचे नाव समीरा बानो असे आहे. सुरतमध्ये राहणाऱ्या समीरा बानोचे तामिळनाडूमध्ये लग्न झाले. ती ISIS मॉड्यूलवर काम करायची. समीरा १६ ते १८ वर्षांच्या मुलांना लव्ह जिहादसाठी तयार करायची आणि समीराही लव्ह जिहादच्या रॅकेटमध्ये सामील असल्याचे आढळून आले.
एटीएसचे डीआयजी दीपेन भद्रन यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी (९ जून) ही कारवाई करण्यात आली. एटीएस काही काळापासून आरोपींवर लक्ष ठेवून होती आणि त्यांच्या प्रत्येक हालचालीवर नजर ठेवली जात होती.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App