राहुल गांधी हे इंडी आघाडीचे पंतप्रधानपदाचे उमेदवार आहेत का? – स्मृती इराणी

भाजपच्या सामान्य कार्यकर्त्याविरुद्ध निवडणूक लढवण्याची हिंमत नाही, त्यांनी.., असंही स्मृती इराणींनी म्हटले आहे.


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीदरम्यान, काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी पंतप्रधान मोदींना सार्वजनिक चर्चेचे निमंत्रण स्वीकारण्याचे आव्हान दिले. यावर आता केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी खरपूस समाचार घेतला आहे. राहुल गांधी हे इंडी आघाडीचे पंतप्रधानपदाचे उमेदवार आहेत का? असा सवाल त्यांनी केला आहे.Is Rahul Gandhi the prime ministerial candidate of Indy Aghadi Smriti Irani



स्मृती इराणी म्हणाल्या की, पहिली गोष्ट म्हणजे ज्या व्यक्तीमध्ये भाजपच्या सामान्य कार्यकर्त्याविरुद्ध निवडणूक लढवण्याची हिंमत नाही, त्यांनी कोणत्याही प्रकारची बढाई मारणे टाळावे. दुसरे म्हणजे, ज्यांना पंतप्रधान मोदींसोबत समान पातळीवर चर्चा करायची आहे, मला विचारायचे आहे की ते इंडी आघाडीचे पंतप्रधानपदाचे उमेदवार आहेत का?

याआधी शनिवारी केरळमधील वायनाड आणि उत्तर प्रदेशातील रायबरेली मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींसोबत जाहीर चर्चेचे निमंत्रण औपचारिकपणे स्वीकारले होते.

अमेठी हा अनेक दशकांपासून काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला आहे. जिथे संजय गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांसारखे पक्षाच्या दिग्गज नेत्यांनी निवडणूक लढवली आहे. 2019च्या लोकसभा निवडणुकीत स्मृती इराणींनी ही जागा जिंकली, तोपर्यंत हा गांधी घराण्याचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता.

Is Rahul Gandhi the prime ministerial candidate of Indy Aghadi Smriti Irani

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात