विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : पहलगाम मधल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने सिंधू जल करार स्थगित केला. त्यानंतर सलाल + बागलीहार आणि किशनगंगा धरणांमध्ये पाणी रोखले. त्याचा दूरगामी परिणाम तर पाकिस्तान वर होणारच आहे पण त्याआधी एकट्या चिनाब नदीचा प्रवाह भारताने रोखून धरल्या बरोबर पाकिस्तानातल्या खरीप हंगामाला 21 % पाणीटंचाईला सामोरे जावे लागेल, असा गंभीर इशारा पाकिस्तानी इंडस रिव्हर सिस्टीम ऍथॉरिटीने दिला. Chenab inflow dips
याचा अर्थ सिंधू, सतलज, रावी आणि झेलम या मोठ्या नद्यांचे प्रवाह भारताने वेगवेगळ्या वेळी रोखले, तर पाकिस्तानात कसा हाहाकार माजेल, याची झलकच या इशार्यातून समोर आली.
भारताने चिनाब नदीचा प्रवाह रोखल्यानंतर पाकिस्तानात इंडस रिव्हर सिस्टिम अथोरिटीची बैठक झाली. या बैठकीला पंजाब सिंध आणि खैबर प्रांतातले अधिकारी उपस्थित होते. त्यांनी नव्या परिस्थितीचा तांत्रिक आढावा घेतला. भारताने आपल्या हद्दीतल्या सगळ्या धरणांचे दरवाजे बंद केल्यानंतर नद्यांमधला पाण्याचा प्रवाह आटला. एकट्या चिनाब नदीचा प्रवाह आटल्याबरोबर पाकिस्तानातल्या मांगला आणि तरबेला धरणांमध्ये पाणीसाठा यायचे बंद झाले. यातून पाकिस्तानला 21 % पाणीटंचाईला सामोरे जावे लागेल, असे तिथल्या चीफ इंजिनियर्सनी बैठकीत सांगितले. खरीप हंगामाच्या उत्तरार्धात म्हणजे जुलै ते सप्टेंबर या महिन्यांत पाकिस्तानात समाधानकारक पाऊस झाला, तरी पाणीटंचाईचे प्रमाण 7 % राहीलच, असा इशाराही या बैठकीत देण्यात आला. या बैठकीला इंडस रिव्हर सिस्टीम ऍथॉरिटीचे अध्यक्ष साहेबजादा मेहमूद शब्बीर उपस्थित होते.
याचा एकूण अर्थ असा, की पाकिस्तानी मंत्र्यांनी किंवा लष्करातल्या म्होरक्यांनी भारताला कितीही दमदाट्या केल्या आणि युद्धाच्या धमक्या दिल्या, तरी प्रत्यक्षात भारताने पाकिस्तानचे नुसते पाणी बंद केल्यानंतर त्या देशाला किती मोठा झटका बसू शकतो, याचा अंदाज इंडस रिव्हर सिस्टीम ऍथॉरिटीने अचूक घेऊन पाकिस्तानी राज्यकर्त्यांना जागे करायचाच प्रयत्न केलाय. पण पाकिस्तानी राज्यकर्ते या इशाऱ्यानंतरही जागे होतील की नाही याविषयी अनुभवाअंती तरी दाट शंका आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App