इजरायली हल्ल्याच्या धसक्यातून इराणला स्वतःचा देश सावरता येईना, पण त्याच्या इतर देशांना धमक्या!!

Ayatollah Ali Khamenei

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : ऑपरेशन रायझिंग लायन मधून इजराइलने केलेल्या हल्ल्यात इराणच्या अण्वस्त्र केंद्रांचे प्रचंड नुकसान झाले. इराणी लष्कर प्रमुख आणि अणुशास्त्रज्ञ मारले गेले. त्यांना इराण वाचवू शकला नाही, पण इराणने इस्राईलवर प्रतिहल्ला केला. 150 पेक्षा जास्त आंतरखंडीय क्षेपणास्त्रे (ballistic missiles) डागली. पण इजरायले ती नाकाम केली. 24 तासाच्या आत इजरायलने पुन्हा इराण मधल्या अण्वस्त्र केंद्रांवर आणि ऑइल रिफायनरी वर हल्ले केले. इराणचे प्रचंड नुकसान केले. त्यातून इराणला सावरता येईनासे झाले, तरी देखील इराणने आता अन्य देशांना धमक्या दिल्या आहेत.

इजरायलने सलग दुसऱ्या दिवशी इराण वर हल्ले कायम ठेवले. त्यांची 100 टार्गेट्स उद्ध्वस्त केली. इराणने प्रतिहल्ला करून 150 क्षेपणास्त्रे इजराइल वर डागली, पण त्यातली बहुतेक क्षेपणास्त्रे इजरायली हवाई सुरक्षा यंत्रणेने नाकाम केली. तेल अवीव मध्ये मध्ये 6 स्फोट झाले. यामध्ये 60 लोक जखमी झाल्याची बातमी आहे, पण इराण किंवा त्याची पुष्टी केली नाही.

याच दरम्यान इराणच्या अध्यक्षांनी आणि इराणच्या सर्वोच्च धार्मिक नेत्यांनी भाषणे करून अन्य देशांना धमक्या दिल्या. इजरायलने गाजा पट्टीत नरसंहार केला, त्यावेळी सगळे देश गप्प बसले होते. आता इराण इजरायलवर प्रतिहल्ला करतोय, त्यावेळी तुम्ही शांत बसावे. इजरायलच्या मदतीला किंवा त्याच्या संरक्षणाला जाऊ नये. अन्यथा तुमच्यावरही हल्ले करावे लागतील, अशी दमदाटी इराणच्या नेत्यांनी केली. इराणचे सर्वोच्च नेते इराणी लष्कर प्रमुखाला आणि अणुशास्त्रज्ञांना वाचवू शकले नाहीत, पण त्यांनी इतर देशांना मात्र दमबाजी केली. त्यामुळे सोशल मीडियावर त्यांची खिल्ली उडत आहे.

Iran’s Supreme Leader Ayatollah Ali Khamenei promised retaliation for the Israeli strikes in a recorded address

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात