IPL Media Rights: बीसीसीआयवर पडणार पैशांचा पाऊस, टीव्हीसोबतच ओटीटीचे प्रसारण हक्क स्वतंत्र विकणार, लिलावाची 33 हजार कोटी ठेवली बेस प्राइस

इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) पैशांचा पाऊस पडतो हे सर्वांनाच माहीत आहे. आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) या खेळातून अधिकची कमाई करण्याचा विचार करत आहे. बीसीसीआयने अलीकडेच आयपीएल मीडिया हक्कांसाठी निविदा जारी केली आहे. ही निविदा 2023 ते 2027 अशी पाच वर्षांसाठी आहे.IPL Media Rights BCCI will get money, OTT’s broadcasting rights will be sold independently along with TV, base price of Rs 33 Thousand Crores


वृत्तसंस्था

मुंबई : इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) पैशांचा पाऊस पडतो हे सर्वांनाच माहीत आहे. आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) या खेळातून अधिकची कमाई करण्याचा विचार करत आहे. बीसीसीआयने अलीकडेच आयपीएल मीडिया हक्कांसाठी निविदा जारी केली आहे. ही निविदा 2023 ते 2027 अशी पाच वर्षांसाठी आहे.

बीसीसीआयने या निविदेसाठी एकूण 33 हजार कोटी रुपये (32890) मूळ किंमत म्हणजेच बेस प्राइस ठेवली आहे. सध्या ही निविदा 74 सामन्यांनुसार ठरविण्यात आली असून, त्यात दहा संघ सहभागी होणार आहेत. मात्र, बीसीसीआयने निविदेत सामन्यांची संख्या वाढवण्याचा पर्यायही ठेवला आहे.



हजारो कोटींची कमाई कशी करणार बीसीसीआय?

यावेळी BCCI वेगवेगळ्या बंडल म्हणजेच पॅकेजेसमध्ये मीडियाचे राइट्स समोर आणत आहे. ज्यामध्ये भारतीय उपखंडासाठी स्वतंत्र प्रसारण करार असेल. क्रिकबझच्या वृत्तानुसार, बीसीसीआयला फक्त भारतीय उपखंडात प्रसारणासाठी प्रति सामन्यासाठी 49 कोटी रुपये मिळतील.

याशिवाय डिजिटल प्रसारणाची किंमत प्रति सामन्यासाठी 33 कोटी रुपये ठेवण्यात आली आहे. तिसऱ्या बंडलमध्ये, 18 सामन्यांसाठी एक स्वतंत्र प्रसारण विंडो तयार करण्यात आली आहे, जी प्रत्येक सामन्यासाठी 16 कोटी रुपये कमवून देईल. यामध्ये स्पर्धेचे उद्घाटन सामने, डबल हेडर सामने आणि प्लेऑफ सामन्यांचा समावेश आहे. हे सामने फक्त OTT वर प्रसारित केले जातील.

निविदेतील शेवटचा बंडल जागतिक प्रसारणासाठी आहे, ज्याची किंमत प्रति सामन्यासाठी 3 कोटी रुपये असेल. सर्व बंडल एकत्र केल्यास, बीसीसीआयची एकूण मूळ किंमत 32890 कोटी रुपये आहे. ही निविदा नुकतीच आली आहे, त्यामुळे आता अनेक कंपन्या त्यासाठी अर्ज करणार आहेत. लिलावात चुरशीची स्पर्धा रंगणार हे तर नक्कीच आहे. यामुळे बीसीसीआय गर्भश्रीमंत होणार आहे.

ई-लिलावात बोली 45 हजार कोटींपर्यंत जाण्याची शक्यता

दरम्यान, सध्या आयपीएल मीडिया राइट्स स्टार नेटवर्ककडे आहेत. पण हे वर्ष 2022 पर्यंत म्हणजेच या वर्षापर्यंतच आहेत. नवीन नेटवर्कला पुढील वर्षापासून ही निविदा मिळू शकते. आता गोष्टी बहुतांशी डिजिटल झाल्या आहेत, त्यामुळेच आयपीएल मीडिया राइट्स ट्रेंड तयार झालेला आहे. या निविदेवर डिस्ने, रिलायन्स, सोनी अशा अनेक दिग्गज कंपन्यांचा डोळा आहे. यामुळे बोली वाढत जाऊन 45 हजार कोटींपर्यंत जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

IPL Media Rights BCCI will get money, OTT’s broadcasting rights will be sold independently along with TV, base price of Rs 33 Thousand Crores

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात