बेरोजगारीच्या नावाखाली संसदेत घुसखोरी; तात्विक मुलामा देण्यासाठी क्रांतिकारकांची बदनामी!!

बेरोजगारीच्या नावाखाली संसदेत घुसखोरी आणि त्या घुसखोरीला तात्त्विक मुलामा देण्यासाठी क्रांतिकारकांची बदनामी!!, हाच संसदेतल्या घुसखोरांचा आणि त्यांच्या म्होरक्यांचा मूळ अजेंडा असल्याचे उघड झाले आहे. संसदेत घुसखोरी करणाऱ्या 6 आरोपींच्या सर्व “बौद्धिक” बॅकग्राऊंड तपासल्यानंतर, त्यांच्याकडे सापडलेले साहित्य पोलिसांच्या हाती लागल्यानंतर त्यातल्या नोंदी उघड झाल्या आणि त्यातूनच वर उल्लेख केलेला देशविघातक अजेंडा उघड झाला आहे!! Intruders in parliament are actually defaming revolutionaries like Bhagat Singh and Netaji Subhash Chandra Bose

संसदेतील घुसखोरांचा मास्टरमाईंड ललित झा हा कोलकत्यात मास्टरजी म्हणून ओळखला जात असे. तो विद्यार्थ्यांना ना वेगवेगळ्या विषयांची ट्युशन देत असेल बऊ बाजारात तो राहत असलेल्या इमारतीत त्याची ओळख सौम्य व्यक्तीमत्त्वाचा मास्टरजी अशीच होती. पण त्याच्याकडे सापडलेल्या डायरीत हुतात्मा भगतसिंग नेताजी सुभाष चंद्र बोस, स्वामी विवेकानंद, जतिन बाघा या महान नेत्यांचे आणि क्रांतिकारकांचे फोटो आणि त्याखाली त्यांचे कोट्स आढळले. वेगवेगळ्या कवी कवींच्या कविता आढळल्या. ज्या कविता स्वातंत्र्यपूर्व काळात क्रांतिकारक मानल्या गेल्या होत्या.

“रोजी रोटी हक़ की बात करेगा, वह कम्युनिस्ट कहलायेगा!!”, “एखादी व्यक्ती मरेल पण व्यक्तीचे तत्व मरणार नाही त्या तत्त्वातून हजारो लोकांना प्रेरणा मिळेल,” असे ललित उर्फ मास्टरजीने नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा फोटो लावून त्याखाली लिहिल्याचे आढळले. याच डायरीत स्वामी विवेकानंदांचा फोटो लावून त्याने, “भारताला आज बॉम्बची गरज आहे आणि आपले हक्क हिरावून घेणाऱ्यांची गरज आहे”, असेही लिहिले आहे.

महाराष्ट्रातला घुसखोर अमोल शिंदे यांच्या काही वह्यांमध्ये देखील क्रांतिकारक भगतसिंग याचेच फोटो आणि त्यांचे कोट्स आढळले. मराठी प्रसार माध्यमांनी देखील या घुसखोर तरुणांचे चित्र “क्रांतिकारक” म्हणूनच रंगवले आहे.

कम्युनिस्टांची जुनी मोडस ऑपरेंडी

ही खरंतर कम्युनिस्ट आणि नक्षलवाद्यांची जुनी मोडस ऑपरेंडी आहे. आपण करीत असलेल्या माओवादी हिंसाचाराला देशी तात्त्विक मुलांना देण्यासाठी भगतसिंग, चंद्रशेखर आजाद यांच्यासारख्या सशस्त्र क्रांतिकारकांची नावे घेणे आणि तेच आपल्या अराजकतावादी विचारसरणीचे जनक आहेत, असे भासववत राहणे हा कम्युनिस्ट आणि नक्षलवाद्यांचा जुना खेळ आहे. भगतसिंगांच्या डायरीतून कम्युनिस्टांना अनुकूल ठरणारे लेखन काढून घेऊन ते “एडिट” करून भगतसिंग नास्तिक असल्याचे कम्युनिस्टांनी गेले अनेक वर्षे भासाविले. भगतसिंग यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी लिहिलेले उद्गार, त्यांच्याकडून घेतलेली प्रेरणा, त्यांचे 1857 चे स्वातंत्र्यसमोर पुस्तक छापणे हे संदर्भ मात्र कधीच पुढे येऊ दिले नाहीत.

शिवाय ज्या भगतसिंगांनी ब्रिटिशकालीन नॅशनल असेंब्लीत बॉम्ब फोडून पत्रके भिरकावली, तेच कृत्य आपले प्रेरणास्थान असल्याचे भासवून स्वतंत्र भारतात या घुसखोरांनी आपणच भगतसिंगांचे खरे अनुयायी असल्याचे आभासी चित्र निर्माण केले आहे. या घुसखोरांचे समर्थक वकील देखील त्याच पद्धतीने भाषा वापरून त्यांच्या गंभीर गुन्ह्याला सौम्य स्वरूप देण्याचे कारस्थान रचत आहेत.

प्रत्यक्षातही देशासाठी बलिदान केलेल्या क्रांतिकारकांची बदनामी आहे. भगतसिंग, नेताजी सुभाष चंद्र बोस, जतिन बाघा या क्रांतिकारकांनी कधीही स्वातंत्र्योत्तर काळात लोकशाही देशात तुम्ही हिंसाचाराच्या मार्गाने हक्क मिळवा, असे कुठेही लिहिलेले नाही. उलट लोकशाही प्रणाली विषयी त्यांनी आस्था दाखवलेले लिखाण ठिकठिकाणी मिळते. अन्यायी, अत्याचारी ब्रिटिश राजवटी विरुद्ध लढण्याची “हत्यारे” निराळी आणि संसदीय लोकशाही प्रणाली स्वीकारलेल्या भारतात स्व हक्कांसाठी स्वकीय सरकार विरुद्ध संघर्ष करण्याची “हत्यारे” निराळी हे तारतम्य स्वातंत्र्यपूर्व काळातील क्रांतिकारकांनी निश्चित बाळगले होते. हे तारतम्य कम्युनिस्टांना आणि त्यांच्यातूनच निर्माण झालेल्या नक्षलवाद्यांना स्वातंत्र्यपूर्व काळातही नव्हते आणि स्वातंत्र्योत्तर काळातही नाही.

यातही या कम्युनिस्ट नक्षलवाद्यांचे वैशिष्ट्य असे की, जेथे ते संसदीय मार्गाने सत्तेवर येतात तेथे बिलकुलच त्यांना सर्वसामान्य जनतेच्या हक्काची काळजी नसते आणि काळजी असलीच, तरी ते केरळ किंवा पश्चिम बंगालच्या विधानसभेत प्रेक्षक गॅलरीतून उड्या टाकून जनतेच्या हक्कांविषयी किंवा बेरोजगारी विषयी बोलल्याचे उदाहरण नाही.

प्रतापराव ढाकणेंशी अनाठायी तुलना

महाराष्ट्रात अमोल शिंदे याने अराजकतावादी तरुणांच्या नादी लागून संसदेत घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला, तर लगेच मराठी माध्यमांना प्रतापराव ढाकणे यांनी महाराष्ट्राच्या विधानसभेत प्रेक्षक गॅलरीतून दिलेल्या घोषणा आणि त्यांनी फेकलेली पत्रके आठवली अमोल शिंदे यांनी प्रतापराव ढाकणे यांची मराठी माध्यमांनी तुलना केली, पण प्रतापराव ढाकणे नंतर संसदीय मार्गाने महाराष्ट्राच्या विधानसभेत आणि देशाच्या लोकसभेत पोहोचले होते हे सत्य मात्र माध्यमे सोयीस्कररित्या विसरली.

क्रांतिकारकांची बदनामी

देशात बेरोजगारीच काय, पण त्यांसारख्या असंख्य समस्या आहेत. हे नाकारण्यात मतलब नाही. पण त्या समस्या सोडवण्यासाठी घटनात्मक लोकशाही चौकटीने आखून दिलेले मार्ग सोडून अराजकतावादी मार्गावर जाणे, ते देखील संसदीय लोकशाही मार्गाने सत्ता मिळवता येत नाही हे लक्षात आल्यानंतर जास्तीत जास्त हिंसक आणि आक्रस्ताळी प्रतिक्रिया व्यक्त करणे हेच आता कम्युनिस्टांचे आणि नक्षलवाद्यांचे काम उरले आहे. संसदेमधली घुसखोरी हे त्याचेच प्रतिबिंब आहे. त्यात कुठलेही क्रांतिकारक कृत्य नाही. भगतसिंग, नेताजी सुभाष चंद्र बोस, जतिन बाघा यांच्या क्रांतिकारक तत्त्वज्ञानाशी त्यांचा दुरान्वये देखील संबंध नाही. प्रत्यक्षात बेरोजगारीच्या नावाखाली संसदेतल्या घुसखोरांनी स्वतःच्या हिंसक कृत्याचे समर्थक करण्यासाठी क्रांतिकारकांच्या नावाची आणि त्यांच्या महान तत्त्वज्ञानाची बदनामी चालवली आहे, यापलीकडे काही नाही!!

Intruders in parliament are actually defaming revolutionaries like Bhagat Singh and Netaji Subhash Chandra Bose

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात