अखिलेश यादवांच्या मुलाखती; नड्डा शहा योगी जनतेच्या दारोदारी!!

विशेष प्रतिनिधी

लखनऊ : उत्तर प्रदेशात आजचा रविवार प्रचाराच्या मोठ्या रणधुमाळीचा ठरला. अखिलेश यादव आणि त्यांचे मित्र पक्षाचे सहयोगी जयंत चौधरी हे पश्चिम उत्तर प्रदेशात विविध वृत्तवाहिन्यांना मुलाखती देताना दिसले, तर भाजपचे नेते जे. पी. नड्डा, अमित शहा, योगी आदित्यनाथ हे विविध शहरांमध्ये जनतेच्या दारोदारी प्रचार करताना दिसले.Interviews with Akhilesh Yadav

अखिलेश यादव यांचा भर योगी आदित्यनाथ यांना टार्गेट करण्यावर दिसत असून यो गी आदित्यनाथ आणि केंद्र सरकार हे डबल इंजिन सरकार उत्तर प्रदेशाच्या काही कामाचे नाही. त्यांनी काही कामे केली नाहीत, असा दावा अखिलेश यादव यांनी विविध वृत्तवाहिन्यांच्या मुलाखतीत आज दिवसभर केला. ट्विटरवर देखील अखिलेश यादव जोरदार ॲक्टिव असून एकापाठोपाठ एक ट्विट करून ते योगी आदित्यनाथ यांच्या सरकारला घेरताना दिसत आहेत. दहा मिनिटांपूर्वी त्यांनी ट्विट करून हाथरस बलात्कार कांडातील युवतीचा 30 जानेवारी रोजी दर वर्षी स्मृतिदिन पाळावा, असे आवाहन उत्तर प्रदेशातील जनतेला केले आहे. उत्तर प्रदेशात जनतेचा भाजपला नकार आहे, असे ते प्रत्येक ट्विटमध्ये आवर्जून सांगताना दिसत आहेत.

एकीकडे अखिलेश यादव यांच्या वृत्तवाहिन्यांवरच्या मुलाखती आणि पत्रकार परिषदा गाजत आहेत, तर दुसरीकडे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे प्रामुख्याने विविध शहरांमध्ये जाऊन पदयात्रा काढण्यावर भर देताना दिसत आहेत. सहारनपूर, बरेली मध्ये अमित शहा यांनी पदयात्रा काढून प्रचार केला. लखनऊ मध्ये जे. पी. नड्डा जनतेच्या घरोघरी गेले. योगी आदित्यनाथ यांनी देवबंद मध्ये पदयात्रा काढली, तर राजनाथ सिंह यांनी कासगंजमध्ये पदयात्रा काढून घरोघरी भाजपचा प्रचार केला.

अखिलेश यादव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टार्गेट करण्याऐवजी योगी आदित्यनाथ यांनाच टार्गेट करण्यावर भर दिला आहे. परंतु, घरोघरी जाऊन प्रचारावर भर मात्र भाजपचे प्रमुख नेते देताना दिसत आहेत. या तुलनेत समाजवादी पक्षाचे नेते घरोघरी प्रचार करताना दिसण्याऐवजी वृत्तवाहिन्यांवर मुलाखती देताना आणि पत्रकार परिषदा घेताना दिसत आहेत.

Interviews with Akhilesh Yadav

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात