Operation Sindoor : ऑपरेशन सिंदूरनंतर आंतरराष्ट्रीय माध्यमांकडून भारताविरोधात अपप्रचार; पुराव्याऐवजी अफवांचा बाजार

Operation Sindoor

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : Operation Sindoor भारताने पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर अचूक आणि निर्णायक कारवाई करत ऑपरेशन सिंदूर यशस्वीपणे पार पाडल्यानंतर, काही आंतरराष्ट्रीय माध्यमांनी भारताविरोधात अपप्रचार सुरू केला आहे. पाकिस्तानने लष्करीदृष्ट्या झालेल्या पराभवाचा बदला शब्दांच्या खेळातून घेण्याचा प्रयत्न केला असून, ब्लूमबर्ग, रॉयटर्स आणि न्यू यॉर्क टाइम्स यांसारख्या डाव्या विचारसरणीच्या माध्यमांनी त्याला आंतरराष्ट्रीय व्यासपीठ दिलं आहे.Operation Sindoor

१३ मे रोजी ब्लूमबर्गने “Chinese Weapons Gain Credibility After Pakistan-India Conflict” या मथळ्याखाली एक लेख प्रसिद्ध केला. या लेखात पाकिस्तानने भारताची पाच फायटर जेट्स पाडल्याचा दावा करण्यात आला, ज्यामध्ये राफेल विमानांचाही समावेश आहे. मात्र, या दाव्याला कोणताही पुरावा—फोटो, व्हिडीओ, किंवा उपग्रह चित्रसादर करण्यात आले नाहीत. लेखाचे मुख्य लेखक होते दोन चिनी पत्रकार जोश झियाओ आणि यियान ली होते. नंतर भारतीय वाचकांना भुलवण्यासाठी सुधी रंजन सेन यांचे नाव जोडलं गेलं.



न्यूयॉर्क टाइम्सनेही सुरुवातीला पाकिस्तानचे दावे उचलून धरत, भारताची ५ विमाने पाडल्याचा उल्लेख केला. यात राफेल, मिग-२९ आणि सुखोई-३० यांचा समावेश होता. परंतु, पुन्हा एकदा कोणताही प्रत्यक्ष पुरावा दिला गेला नाही. फक्त एका तथाकथित ‘तज्ज्ञा’चा अंदाज नमूद करण्यात आला.

पण जेव्हा भारताने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत केलेल्या हल्ल्यांचे उपग्रह छायाचित्रांसह पुरावे सादर केले, तेव्हा न्यू यॉर्क टाइम्सने थोडी भूमिका बदलली. १४ मे रोजी त्यांनी “India and Pakistan Talked Big, But Satellite Imagery Shows Limited Damage” असा लेख प्रसिद्ध केला. त्यात त्यांनी मान्य केलं की पाकिस्तानच्या लष्करी तळांना सर्वाधिक नुकसान भारताच्या हल्ल्यांमुळे झालं. तरीही, भारताच्या यशाची खिल्ली उडवण्याचा प्रयत्न त्यांनी केला.

या प्रकरणामुळे भारतीय सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत. ब्लूमबर्ग, NYT आणि इतर माध्यमांची जोरदार टीका करत, त्यांची पत्रकारिता म्हणजे ‘प्रोपगंडा पत्रकारिता’ असल्याchr स्पष्टपणे सांगितलं जात आहे.

ऑपरेशन सिंदूर हे भारताने अत्यंत काटेकोरपणे आणि अचूकतेने पार पाडलेली कारवाई होती. पाकिस्तानचे दहशतवादी तळं, ड्रोन बेस, रडार सिस्टीम्स आणि शस्त्रसाठ्यांवर लक्ष्य साधण्यात आलं. याचे स्पष्ट पुरावे आजही उपग्रह चित्रांमधून दिसून येतात. दुसरीकडे, पाकिस्तान आणि चीनकडून कोणताही ठोस पुरावा न देता केवळ अफवांचा, अपप्रचाराचा आधार घेत भारताच्या यशावर प्रश्नचिन्ह उभं करण्याचा प्रयत्न सुरु आहे.

International media spreads propaganda against India after Operation Sindoor; Rumors instead of evidence

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात