Interim Budget 2024 : ना बड्या तरतुदी ना चमकदार घोषणा, पण श्वेतपत्रिकेतून मांडणार आधीच्या सरकारच्या सविस्तर उणिवा!!

Interim Budget 2024 by nirmala sitharaman

ना बड्या तरतुदी, ना चमकदार घोषणा पण श्वेतपत्रिकेतून मांडणार आधीच्या सरकारच्या सविस्तर उणिवा!!, असेच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज मांडलेल्या अंतरिम अर्थसंकल्पाच्या भाषणाचे वैशिष्ट्य मानावे लागेल. Interim Budget 2024 by nirmala sitharaman

लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन मोठमोठ्या घोषणा करतील, मोठमोठे आकडे सादर करून एक चमकदार अर्थसंकल्प सादर करतील आणि आधीच्या सरकारांच्या “निवडणूक बजेट” सादर करण्याच्या परंपरा राखतील, अशा अटकळी बांधल्या जात होत्या. परंतु, प्रत्यक्षात तसे काही घडले नाही. कारण निर्मला सीतारामन यांनी फार मोठ्या घोषणा करण्याऐवजी मोदी सरकारने लागू केलेल्या विविध योजनांचा विस्तार करण्यावरच भर दिला, इतकेच नाहीतर समाजातल्या शेतकरी, महिला, युवक आणि गरीब या चार जातींच्या कल्याणकारी योजनांचे लाभ जास्तीत जास्त तळागाळापर्यंत पोहोचविण्याचा इरादा बोलून दाखविला. त्यापलीकडे जाऊन त्यांनी ना कर रचनेत बदल केला अथवा ना कोणत्याही नव्या योजनांचा घोषणा केल्या!!

पण आपल्या अर्थसंकल्पीय भाषणाच्या अखेरीस त्यांनी अत्यंत महत्त्वाचा मुद्दा पेश करून 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने एक वेगळीच पार्श्वभूमी तयार केली, ती घोषणा म्हणजे केंद्रीय अर्थमंत्रालय “अर्थव्यवस्था पूर्वी आणि आता” या स्वरूपाची श्वेतपत्रिका सादर करून आधीच्या सरकारांच्या उणिवा संसदेसमोर तपशीलवार मांडणार आहे आणि हा खऱ्या अर्थाने 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर “राजकीय बॉम्ब” आहे.

आधीच्या सरकारच्या म्हणजेच सोनिया गांधी आणि मनमोहन सिंग यांच्या यूपीए सरकारच्या काळातील उणिवा श्वेतपत्रिकेच्या रूपाने जनतेसमोर मांडण्याचा मोदी सरकारचा इरादाच त्यांनी बोलून दाखविला. यातून मोदी सरकार आधीच्या सरकारच्या काळातील व्यवस्थात्मक उणिवा, त्या सरकारच्या काळातील घोटाळ्यांमुळे झालेली प्रचंड आर्थिक हानी संसदेत ऑन रेकॉर्ड आणून जनतेसमोर तपशीलवार मांडणार आहे.

*आत्तापर्यंत यूपीए सरकारच्या काळात टू जी पासून कॉमनवेल्थ गेम पर्यंत वेगवेगळे घोटाळे झाले. त्याचे आरोप प्रत्यारोप जाहीर सभांमधून निवडणुकीच्या प्रचारातून आणि संसदेमधल्या विविध भाषणांमधून होत राहिले. परंतु ते आरोप फक्त भाषणांच्या पातळीवर न ठेवता श्वेतपत्रिकेच्या माध्यमातून ते संसदेच्या रेकॉर्डवर आणून त्या घोटाळ्यांमुळे झालेली प्रचंड आर्थिक हानीची तपशीलवार आकडेवारीनिशी माहिती केंद्रीय अर्थ मंत्रालय मांडणार आहे.

… आणि हाच 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने भाजप आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा आधार तयार करण्याची मोदी सरकारची योजना आहे. निर्मला सीतारामन यांनी भाषणाच्या शेवटी मांडलेल्या श्वेतपत्रिकेच्या मुद्द्याचा हा खरा अर्थ आहे. संसदेच्या चालू अधिवेशनातच ही श्वेतपत्रिका मांडून सरकारी पातळीवरच निवडणुकीच्या प्रचाराला गती देण्याची मोदी सरकारची ही मोठी राजकीय खेळी आहे.

Interim Budget 2024 by nirmala sitharaman

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात