वृत्तसंस्था
नवी दिल्ली : नोकरदार PF खातेधारकांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. कर्मचारी भविषिय निर्वाह निधी संघटना EPFO ने खातेधारकांच्या खात्यात पीएफवरील व्याजाचे पैसे जमा करण्यास सुरुवात केली आहे. याचा 7 कोटीहून अधिक पीएफ धारकांना लाभ होणार आहे. 2022 या आर्थिक वर्षाचे व्याज देण्यास ईपीएफओने सुरुवात केली असून,8.1 % दराने हे व्याज देण्यात येणार आहे. त्यामुळे जर तुम्ही PF खातेधारक असाल तर आपले PF Account नक्की चेक करा. Interest starts accruing in PF account
खात्यात येणार व्याज
8.1 % व्याजाच्या दरानुसार विचार केल्यास पीएफ खातेधारकांच्या खात्यात भरघोस रक्कम जमा होणार आहे. ज्या पीएफ धारकांच्या खात्यात 1 लाख रुपये रक्कम जमा असेल त्यांना व्याजाची रक्कम म्हणून 8 हजार 100 रुपये मिळणार आहेत. तसेच ज्यांच्या खात्यात 5 लाख रुपये जमा आहेत त्यांच्या खात्यावर 40 हजार 500 रुपये जमा होणार आहे.
असा चेक करा PF चा बॅलेन्स
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App