वृत्तसंस्था
नवी दिल्ली : पहलगाम हल्ल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी प्रत्येक राज्याच्या मुख्यमंत्र्यांना फोन करून त्यांच्या राज्यातले पाकिस्तानी नागरिक पुन्हा पाकिस्तानात पाठवून देण्याची सक्त सूचना केली. त्या पाठोपाठ विविध राज्यांच्या वेगवेगळ्या शहरांमधून पाकिस्तानी नागरिकांच्या याद्या करणे सुरू झाले. यात राजधानी दिल्लीमध्ये इंटेलिजन्स ब्युरोने तब्बल 5000 पाकिस्तानी नागरिकांची ओळख पटवली असून ती यादी इंटेलिजन्स ब्युरोने दिल्ली पोलिसांकडे सोपवली. या सगळ्या नागरिकांना पुढच्या 48 तासांमध्ये पाकिस्तानात पाठवायचे आदेश गृह मंत्रालयाने काढले. पाकिस्तानी नागरिकांना दिलेले मेडिकल पासून डिप्लोमॅटिक पर्यंतचे सर्व प्रकारांचे व्हिसा भारत सरकारने 29 एप्रिल 2025 नंतर रद्द ठरवलेत.
गुजरात मध्ये देखील पाकिस्तानी आणि बांगलादेशी नागरिक शोध मोहीम जोरात सुरू असून अहमदाबाद मध्ये 550 पेक्षा अधिक बांगलादेशी घुसखोर आढळले त्या पाठोपाठ सुरत मध्ये 1000 पेक्षा जास्त बांगलादेशी घुसखोरांना आयडेंटिफाय केले या सगळ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांना परत बांगलादेशात पाठवण्याची प्रक्रिया सुरू केली.
महाराष्ट्रामध्ये 5000 पेक्षा जास्त पाकिस्तानी नागरिक आढळले असून त्यांना पुढच्या 48 तासात महाराष्ट्राबाहेर काढून पाकिस्तानात पाठवण्याची व्यवस्था केली जाईल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले.
दिल्लीत आढळून आल्याल्या 5000 पेक्षा जास्त पाकिस्तानी नागरिकांपैकी 900 पाकिस्तानी नागरिक मजनू का टिला परिसरात आढळले, तर साक्षी पाकिस्तान परिसरात आढळले या सगळ्यांच्या कागदपत्रांची छाननी करून पुढच्या 48 तासात त्यांना पाकिस्तानात परत पाठवण्यात येईल.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App